Rahul Gandhi Congress twitter
देश

'RSS कट्टरतावादी, फॅसिस्ट संघटना, भाजप कायम सत्तेत राहणार नाही'; राहुल गांधींचा पुन्हा भाजपवर हल्ला

भाजप कायमच सत्तेत राहणार नाही - राहुल गांधी

Pramod Yadav

भारतातील लोकशाही पद्धत पूर्णपणे बदलली असून, याला आरएसएस नावाची संघटना कारणीभूत आहे. आरएसएसवर एक कट्टरतावादी आणि फॅसिस्ट संघटना आहे, जिने भारतातील जवळपास सर्व संस्थांवर कब्जा केला आहे. भाजप कायमच सत्तेत राहणार नाही. लंडनस्थित चॅथम हाऊस या थिंक टँकमध्ये बोलताना अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला.

आरएसएसवर निशाणा साधत राहुल गांधींनी त्यांची तुलना मुस्लिम ब्रदरहूडशी केली. मुस्लीम ब्रदरहुडच्या धर्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उभारणी झाल्याचे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी म्हणाले की, 'भाजपला कोणीही हरवू शकत नाही' असे नरेटिव्ह सध्या देशात चालवले जात आहे. भाजप कायम सत्तेत राहणार नाही, हे जनतेनेही समजून घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, जर तुम्ही स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचा काळ पाहिला तर काँग्रेस पक्ष सर्वाधिक काळ सत्तेत आहे. भाजप 10 वर्षे सत्तेत असून, त्यापूर्वी आम्ही 10 वर्षे सत्तेत होतो.

राहुल गांधी म्हणाले की, कट्टरवादी, फॅसिस्ट संघटनेने भारतातील सर्व संस्था काबीज केल्या आहेत. देशातील विविध संस्था कशा बळकावल्या गेल्या ही बाब मला आतून हादरवून टाकते. प्रेस, न्यायपालिका, संसद आणि निवडणूक आयोग हे सर्वच कोणत्या ना कोणत्या मार्गाने धोक्यात आणि नियंत्रित आहेत.

देशात काही मोठे बदल झाले आहेत. काँग्रेस आणि यूपीएला एका गोष्टीबद्दल आश्चर्य वाटले की शहरी आणि ग्रामीण भागात झपाट्याने बदल होत आहेत. आमचे लक्ष ग्रामीण भागावर होते, आम्ही सुरुवातीला शहरी भागात चूक केली, ही वस्तुस्थिती आहे. ते नाकारता येत नाही. असे राहुल गांधी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढतील; घरातील पूजनात सहभागी व्हा

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

Ponda Accident: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Viral Post: "विश्वचषक जिंकायचा असेल तर अजित आगरकर, गौतम गंभीरला हटवा", व्हायरल पोस्टवर नवज्योत सिंग सिद्धू संतापले

SCROLL FOR NEXT