BJP andCongress Dainik Gomantak
देश

Congress Files: भाजपने प्रदर्शित केला कॉंग्रेस फाइल्स; काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची किंमत...

Congress Files: काँग्रेसमुळेच आपला देश प्रगती आणि विकासाच्या मार्गावर मागे पडला आहे, असंही भाजपने म्हटले आहे

दैनिक गोमन्तक

Congress Files: बीबीसीने प्रदर्शित केलेल्या इंडिया: द मोदी क्वेश्चन या दोन भागांच्या माहितीपटावरुन देशात मोठा वाद निर्माण होता. आता भाजपने काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करत एक व्हिडिओ प्रदर्शित केला आहे.

महत्वाचे म्हणजे याला काँग्रेस फाइल्स असे नाव दिले आहे. या व्हिडीओमध्ये काँग्रेसने जनतेच्या कष्टाने कमावलेल्या 48 ट्रिलियन 20 अब्ज 69 कोटी रुपयांची लूट केल्याचं म्हटले आहे. यामध्ये कोळशापासून 2-जी आणि कॉमनवेल्थ घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या घोटाळे आणि भ्रष्टाचाराची किंमत देशाला चुकवावी लागली आहे. काँग्रेसमुळेच आपला देश प्रगती आणि विकासाच्या मार्गावर मागे पडला आहे, असंही भाजपने म्हटले आहे.

दरम्यान, बीबीसीने प्रदर्शित केलेल्या इंडिया: द मोदी क्वेश्चन या डॉक्युमेंट्रीच्या पहिल्या भागात नरेंद्र मोदींच्या राजकारणातील सुरुवातीच्या टप्प्याचा मागोवा घेण्यात आलेला आहे. ज्यामध्ये मोदी हे भारतीय जनता पक्षात पुढे जात गुजरातच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचतात.

या दरम्यान, 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीत 1 हजाराहून अधिक लोक मारले गेले. या प्रकरणाचाही उल्लेख या डॉक्युमेंट्रीत आहे.

या माध्यमातून गुजरातमध्ये झालेल्या दंगलीत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मोदींनी काय भूमिका पार पाडली असा प्रश्न विचारण्यात आला होता. ही मालिका प्रदर्शित झाल्यानंतर केंद्राने यावर बंदी घातली होती. मात्र त्यानंतर अनेक ठिकणी बेकायदेशीरपणे ही मालिका बघण्यात आली होती.

केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याबरोबरच आता भाजपने कॉग्रेसबद्दल जारी केलेल्या व्हिडिओचा काय परिणाम होणार, कॉग्रेस यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT