Corbevax  Dainik Gomantak
देश

बायोलॉजिकल ई च्या Corbevax लसीला मिळाली मंजूरी

बायोलॉजिकल ईच्या Corbevax लसीला मान्यता देण्यात आली आहे. किशोरवयीन मुलांसाठी ही दुसरी कोरोना लस असणार आहे.

दैनिक गोमन्तक

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने बायोलॉजिकल ई लस Corbevax ला मान्यता दिली आहे. देशातील किशोरवयीन मुलांसाठी (12 ते 18 वर्षे वयोगटातील) ही दुसरी कोरोना लस असणार आहे. भारत बायोटेक कोवॅक्सिनला 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी देशात आधीच वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Biological Es Corbevax Vaccine Approved)

बायोलॉजिकल ई ने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील पहिली स्वदेशी विकसित रिसेप्टर बाइंडिंग डोमेन (RBD) कोरोना विरूद्ध प्रोटीन सब-युनिट लस, बायोलॉजिकल ई लिमिटेडची कॉर्बेव्हॅक्स (Corbevax) लस 12 ते 18 वर्षे वयोगटासाठी आपत्कालीन वापरासाठी देण्यात आली आहे.

DCGI च्या तज्ञ समितीने ही शिफारस केली

गेल्या आठवड्यात असे वृत्त आले होते की, केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने सोमवारी काही अटींसह 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बायोलॉजिकल E's Covid-19 लस 'Corbevax' वापरण्याची शिफारस केली होती.

त्याच वेळी, NITI आयोगाचे सदस्य VK पॉल यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, ''लसीकरणाची अतिरिक्त गरज लक्षात घेण्यात आली आहे. त्याच वेळी, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने यापूर्वीच 28 डिसेंबर रोजी आपत्कालीन परिस्थितीसाठी कॉर्बेवॅक्सला मर्यादित आधारावर मान्यता दिली आहे. कोरोनाविरुध्द भारतात विकसित केलेली ही RBD आधारित लस आहे.''

तसेच, “CDSCO च्या COVID-19 वरील विषय तज्ञ समितीने (SEC) अर्जावर चर्चा केली आहे. शिवाय 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी बायोलॉजिकल EK Corbevax चा वापर करण्यासाठी मंजूर देण्यात आली आहे. तत्पूर्वी ही शिफारस अंतिम मंजुरीसाठी डीसीजीआयकडे पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते. अशा परिस्थितीत या लसीला DCGI ने ग्रीन सिग्नल दिला आहे.

शिवाय, 9 फेब्रुवारी रोजी DCGI ला पाठवलेल्या अर्जात, बायोलॉजिकल ई लि.चे गुणवत्ता आणि नियामक व्यवहार प्रमुख श्रीनिवास कोसाराजू यांनी सांगितले होते की, कंपनीला पाच वर्षे वयोगटातील कॉर्बेव्हॅक्सच्या फेज II-III क्लिनिकल चाचण्या घेण्याची परवानगी देण्यात आली होती. कॉर्बेव्हॅक्स लसीचे 28 दिवसांच्या आत दोन डोस देण्यात येतील. तसेच ही लस दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात साठवली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT