Food Poisoning Dainik Gomantak
देश

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

Satyanarayan Puja Food Poisoning Case: खंगुराडीह पंचायती अंतर्गत असलेल्या राम खंगुरा गावात सत्यनारायण देवाच्या पूजेचा प्रसाद खाल्ल्यानंतर सुमारे 100 हून अधिक लोकांना अन्नातून विषबाधा झाली आहे.

Manish Jadhav

Muzaffarpur Food Poisoning News: बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली. खंगुराडीह पंचायती अंतर्गत असलेल्या राम खंगुरा गावात सत्यनारायण देवाच्या पूजेचा प्रसाद खाल्ल्यानंतर सुमारे 100 हून अधिक लोकांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाली. प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लहान मुले, महिला आणि पुरुषांना उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरु झाला, ज्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. या घटनेत बाधितांची संख्या मोठी असल्याने आरोग्य यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली असून सर्व रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील रहिवासी लोटन दास यांच्या मुलाचा विवाह 17 एप्रिल रोजी होणार आहे. या मंगल कार्याची सुरुवात म्हणून शनिवारी त्यांच्या घरी सत्यनारायण कथेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेला गावातील नागरिक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजा संपल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. शनिवारी रात्रीपर्यंत सर्व काही सुरळीत होते, मात्र रविवारी सकाळपासून अचानक एकामागून एक लोकांची तब्येत बिघडू लागली. अनेकांना मळमळणे आणि पोटात जोरात कळा येण्यास सुरुवात झाली. बघता बघता आजारी पडणाऱ्यांचा आकडा शंभरीपार पोहोचला. यामध्ये सर्वाधिक संख्या ही महिला आणि लहान मुलांची आहे.

एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडल्याची माहिती मिळताच कटरा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका तातडीने गावात पोहोचली. रुग्णांची गंभीर अवस्था पाहता त्यांना कटरा आणि सिंहवाडा येथील रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले. कटरा आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉ. कुमार कल्याण यांनी सांगितले की, हे प्राथमिक दृष्ट्या 'फूड पॉयझनिंग'चे प्रकरण आहे. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे सर्व रुग्ण आता धोक्याबाहेर आहेत आणि प्राथमिक उपचारानंतर अनेकांना घरी सोडण्यात आले. मात्र, खबरदारी म्हणून काही जणांना अद्याप डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

या घटनेचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाने प्रसादासाठी वापरलेले साहित्य आणि शिल्लक राहिलेल्या प्रसादाचे नमुने जप्त केले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कटरा पोलीस (Police) ठाण्याचे प्रमुख मनीष कुमार यांनीही गावात धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. आनंदाच्या कार्यात अशा प्रकारे विरजण पडल्याने दास कुटुंबासह संपूर्ण गावावर सध्या चिंतेचे सावट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT