Rajendra Arlekar Convoy Accident
Rajendra Arlekar Convoy Accident  Dainik Gomantak
देश

Rajendra Arlekar Convoy: बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात

Akshay Nirmale

Rajendra Arlekar Convoy Accident: बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या ताफ्याला वैशाली जिल्ह्यातील भगवानपूर येथे भीषण अपघात झाला आहे. राज्यपाल आर्लेकर पाटण्याहून मुझफ्फरपूरला जात असताना हाजीपूर-मुझफ्फरपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 22 वर हा अपघात झाला.

भगवानपूरमधील रतनपुरा येथे त्यांच्या ताफ्यातील अग्निशमन गाडी दुभाजकावर आदळली आणि उलटली. दुभाजकाला धडकून अग्निशमन दलाचे वाहन शेजारील रिक्षावर जाऊन धडकले. दरम्यान, राज्यपाल आर्लेकर पुर्णतः सुरक्षित आहेत.

आर्लेकर हे मूळचे गोव्याचे आहेत. बिहारचे राज्यपाल होण्याआधी ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.

या अपघातात अग्निशमन दलाचे तीन जवान आणि ऑटोमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. तथापि, या अपघातानंतर राज्यपालांचा ताफा थांबला नाही, हा ताफा थेट मुझफ्फरपूरच्या दिशेने निघाला. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना वाहनांमधून बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनही पोहोचले.

सर्व जखमींना स्थानिक स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. तेथे प्राथमिक उपचारानंतर सर्वांना चांगल्या उपचारासाठी हाजीपूर रुग्णालयात पाठवण्यात आले. राज्यपालांच्या ताफ्याला अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले.

येथे काही काळ रास्ता रोको करण्यात आला. वाहनांच्या रांगा लागल्या. मात्र, वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी फोडली.

या अपघातातील जखमींमध्ये अग्निशमन दलाचे जवान बंबम ​​सिंग, आदर्श कुमार, सुधीर कुमार हे तर हुसैना खुर्द येथील रहिवासी संजय साहनी (वय 38 वर्षे), बंदना कुमारी (18 वर्षे), संतोष पासवान (34 वर्षे) आणि सत्यनारायण पासवान (60 वर्षे) हे रिक्षामधील प्रवासीही जखमी झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Goa Today's Live News: मतदानाचा उच्चांक भाजपला घरी पाठविण्यासाठी!

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची गोव्याला येणारी फ्लाईट रद्द, दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ Video

Delhi Excise Policy Case: केजरीवाल विरुद्ध आमच्याकडे पुरावे, राजकारणाशी आमचा संबंध नाही; ED

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

SCROLL FOR NEXT