Bihar Crime Dainik Gomantak
देश

Bihar Job Scam: नोकरी देण्याच्या नावााखाली 200 मुलींसोबत दुष्कर्म; पीडितांना ओलिस ठेवून मारहाण

Bihar Job Scam: बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Bihar Job Scam: बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकर भरतीच्या नावाखाली अहियापूरमध्ये सुमारे 200 मुलींना ओलीस ठेवल्याचा आरोप आहे. एवढचं नाहीतर पीडित मुलींवर लैंगिक अत्याचार करुन बेल्टने मारहाण करण्यात आली. छपरा जिल्ह्यातील एका पीडितेने धक्कादायक खुलासा केला. मुझफ्फरपूरमध्ये घडलेल्या या घटनेबाबत तिने गुन्हाही दाखल केला.

रिपोर्टनुसार, आरोपींच्या टोळीने बिहारमधील बेरोजगारी आणि स्थलांतराच्या मुद्याला शस्त्र बनवले आणि डीव्हीआर नावाचे बनावट मार्केटिंग रॅकेट (कंपनी) सुरु केले. सोशल मीडियाचा आधार घेत नोकरी देण्याच्या ऑफर पोस्ट केल्या. या पोस्टमध्ये मोठ्या पगाराची नोकरी देण्याचा दावा करण्यात आला. विशेष म्हणजे, त्या फक्त मुलींसाठी होत्या.

पीडितेनुसार, डीव्हीआर नावाच्या कंपनीने फेसबुकवर मुलींसाठी नोकरीची ऑफर पोस्ट केली होती. नोकरीची संधी म्हणून तिने अर्ज केला. निवड झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी तिला 20 हजार रुपये मागण्यात आले. पैसे जमा केल्यानंतर आरोपींनी तिच्यासह अनेक मुलींना अहियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बखरीजवळ ठेवले. मात्र, तीन महिने उलटूनही त्यांना पगार देण्यात आला नाही. यानंतर या मुलींनी कंपनीचा सीएमडी तिलक सिंह याच्याशी संपर्क साधला. मात्र त्याने पीडितांना कंपनीसाठी आणखी 50 मुलींची भरती करण्याचा आदेश दिला. एवढेच नाहीतर त्यानंतर त्यांचा पगार 50 हजार होईल असे त्याच्याकडून सांगण्यात आले.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने आरोपीला सांगितले की ती आणखी 50 मुलींना कंपनीशी जोडू शकत नाही, तेव्हा तिला तिच्या ओळखीच्या आणि संपर्कातील लोकांशी संपर्क साधण्यास भाग पाडले.

दरम्यान, तोपर्यंत आपल्याला कंपनीची वस्तुस्थिती माहीत नसल्याचे तिने सांगितले आणि पैशाच्या लोभापायी तिने आपल्या ओळखीच्या लोकांना कंपनीशी जोडायला सुरुवात केली. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी (Police) या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी कंपनीच्या कथित कार्यालय आणि अहियापूर येथील हॉस्टेलवर छापा टाकला. तेथून त्यांनी अनेक मुलींची सुटका केली. पण छापेमारीची माहिती मिळताच सीएमडी तिलक सिंह अनेक मुलींसोबत हाजीपूरला पळाला, जिथे त्याने पीडितेशी जबरदस्तीने लग्न केले.

पीडितेने आरोप केला की, मुझफ्फरपूरमध्ये असतानाही आरोपीने (Accused) तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि तिचा गर्भपातही केला. त्याचबरोबर जेव्हाही ती लग्नानंतर घरच्यांना भेटण्याचा हट्ट करत असे तेव्हा आरोपी तिला मारहाण करुन अडवायचा.

पोलिसांनी आता याप्रकरणी एफआयआर नोंदवला असून पुढील तपास सुरु केला आहे. पीडितेने पुढे आरोप केला की, तिने बनावट नोकर भर्ती कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर, तिलक सिंहने तिचे अपहरण करण्याचा कट रचला आणि तिला न्यायालयात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. एवढचे नाहीतर त्याने तिच्या भावाला पाटण्याला बोलावून जीवे मारण्याची धमकी दिली.

विशेष म्हणजे हा तोच परिसर आहे जो 'मुझफ्फरपूर शेल्टर होम केस'मुळे बदनाम झाला होता, जिथे 34 मुलींच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. या भीषण प्रकरणावर बॉलीवूडचा 'भक्त' नवाचा चित्रपटही आला होता. आरोपी ब्रजेश ठाकूर स्थानिक वृत्तपत्रही चालवत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'फर्स्ट क्लास' ऑरा; 'जेलर 2' च्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द! पुन्हा एकदा पाऊस ठरला व्हिलन; फॉर्ममध्ये परतला कर्णधार 'सूर्या'

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मडगावच्या PSI विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

IND vs AUS 1st T20: सर्वात जलद 150 षटकार...! कर्णधार सूर्यकुमार यादवचं धूमशान, तूफानी षटकार ठोकत रोहित शर्माला सोडले मागे; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT