bihar extra marital affair wife complained  Dainik Gomantak
देश

बायकोची 'इच्छा' अधुरीच राहिली, मोबाईलने उलगडला सगळा खेळ!

Bihar News: बिहारमधील अररिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पत्नीने पतीवर खळबळजनक आरोप केला आहे.

Manish Jadhav

Bihar News: बिहारमधील अररिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पत्नीने पतीवर खळबळजनक आरोप केला आहे. फारबिसगंज पोलिस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका महिलेने पतीविरोधात पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत तिने पतीवर इतर महिलांशी अनैतिक संबंध ठेवणे, मारहाण करणे यासह अनेक आरोप केले आहेत. महिलेचे म्हणणे आहे की, पतीमुळे तिच्या सर्व इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी तिने पोलीस ठाणे प्रमुखांकडे केली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

15 वर्षांपूर्वी लग्न झाले

पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत नजराना खातून या महिलेने म्हटले की, मोहम्मद फिरोजसोबत 4 ऑगस्ट 2008 रोजी मुस्लिम रितीरिवाजांनुसार तिचा विवाह झाला होता. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नजरानाचा आरोप आहे की, लग्न झाल्यापासून तिच्या पतीचे इतर महिलांसोबत अवैध संबंध आहेत. विरोध करताच तो मारहाण करतो. पोलिसांना दिलेल्या अर्जात नजरानाने (महिलेने) म्हटले की, पतीच्या या वृत्तीमुळे आपण त्याला सोडून न्यायालयात धाव घेतली. नंतर पतीने आपली चूक मान्य करुन लेखी आश्वासन दिले, त्यानंतर ती घरी परतली.

महिलेने पोलिसांना सांगितले की, 12 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता पती आपल्या कारमधून बाहेर जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. काही कामासाठी बाहेर जात असल्याचे त्याने घरी सांगितले. पीडितेने अर्जात म्हटले की, जेव्हा तिने पतीच्या मोबाईलचे लोकेशन पाहिले तेव्हा तो जवळच होता. तपास केला असता त्याची गाडी वॉर्ड क्रमांक 18 येथील पाण्याच्या टाकीजवळ पार्क केलेली आढळून आली. यादरम्यान पतीला 15 वर्षांच्या मुलीसह रंगेहात पकडण्यात आले. महिलेचा आरोप आहे की, तिने विरोध केल्यावर दोघांनीही तिला मारहाण करुन घटनास्थळावरुन पळवून लावले.

महिलेने आपल्या अर्जात पती आणि मुलीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी फारबिसगंज पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस स्टेशन प्रभारी राघवेंद्र सिंह यांनी सांगितले की, अर्ज प्राप्त झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तपासानंतर कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT