Civilians attacked police in Bihar Dainik Gomantak
देश

Video: ना कायदा ना सुव्यवस्था; लाठ्या-काठ्या घेऊन लोकांनी पोलिसांनाच पळवले

Bihar च्या मुजफ्फरपूरमधील (Muzaffarpur) देवरिया गावात जनावरांच्या बलिदानास मनाई केल्याबद्दल लोकांचा पोलिसांशी मोठा संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले आहे.

दैनिक गोमन्तक

बिहार...गुंडाराज, जंगलराज आणि असे वेगवेळे शब्द बिहारच्या कायदा सुव्यवस्थेचं वर्णन करण्यासाठी वापरले जातात. बिहारमध्ये घडणाऱ्या अशा वेगवेळ्या घटनांमधून हे नेहमीच दिसुन येत. मात्र यावेळी बिहारच्या मुजफ्फरपूरमधील लोकांनी थेट पोलिसांनाच दंडूके घेऊन पळवल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या मागे हा जमाव लागल्याने पोलिसांना त्या ठिकाणहून पळ काढावा लागला असल्याचा एक व्हीडीओ समोर आला आहे. जनावरांच्या बिलिदानाला विरोध केल्याने लोकांच्या समुहाने थेट पोलिसांवरच हल्ला चढवल्याचे पहायला मिळाले आहे.

बिहारच्या मुजफ्फरपूरमधील देवरिया गावात जनावरांच्या बलिदानास मनाई केल्याबद्दल लोकांचा पोलिसांशी मोठा संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले आहे. या घटनेचा व्हीडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसतो आहे.

या ठिकाणी लोक श्रावण महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी लोक प्रार्थना करतात आणि प्राण्यांचा बळी देतात अशी माहिती मिळते आहे. तर या वर्षी मात्र जनावरांचा बळी देण्याच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता अशी माहिती स्थानिक प्रशासकिय अधिकारी अनिल कुमार यांनी दिली आहे.

निर्णयाचे उल्लंघन करून, काही लोक जनावरांचा बळी देण्यावर ठाम होते, त्याला पोलिसांनी विरोध केल्याने लोकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली ज्यात डझनभर पोलिस जखमी झाले. तरी परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि दोषींची ओळख पटवली जात आहे असेही अनिल कुमार यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

Goa Liberation Day: 'ऑपरेशन विजय'च्या शूरवीरांना सलाम! राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांकडून 'गोवा मुक्ती दिना'च्या शुभेच्छा

Mopa Airport: पहिल्यांदा गोव्यातच! ‘मोपा’ विमानतळावर डिजिटल व्हिडिओवॉल; भारतातील पहिलेच डिझाईन

रॉड्रीक्स यांच्या प्रयत्नाने मुंबईत गोमंतकीयांची प्रचंड सभा भरली, 20 हजार गोवावासीय उपस्थित होते; ‘छोडो गोवा’ ठराव संमत झाला

SCROLL FOR NEXT