Death form Poisonous Liquor in Bihar Dainik Gomantak
देश

Bihar: बनावट दारू प्यायल्याने 8 जणांचा मृत्यू, 11 जण झाले आंधळे

Death form Poisonous Liquor in Bihar: बनावट मद्य प्राशन केल्याने बिहारमध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून 30 जणांची प्रकृती गंभीर, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

बिहारमधील (Bihar) छपरा येथे 24 तासांत विषारी दारूमुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पूजा झाल्यानंतर गावातील डझनभर लोकांनी दारू प्यायली. 30 हून अधिक लोकांची प्रकृती बिघडली असून त्यापैकी 11 जण आंधळे झाले आहे . या प्रकरणी छपराचे जिल्हा दंडाधिकारी राजेश मीना यांनी शुक्रवारी आठ जणांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. गुरुवारी जिल्हा दंडाधिकारीही पथकासह गावात पोहोचले होते. यादरम्यान विषारी दारू पिल्याने प्रथमदर्शनी मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले.

सारणच्या मकर, भेल्डी, परसा आणि अमनौर पोलीस ठाण्याच्या हद्दीचा भाग फुलवारिया गावातील भाठा टोळीचा आहे. हा परिसर मेकर पोलीस ठाण्यांतर्गत येते. सध्या पटनाच्या (Patana) पीएमसीएचमध्ये डझनहून अधिक लोक दाखल आहेत, तर काही लोकांवर छपरा सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत्युमुखी पडलेल्या आठ जणांची यादीही आली आहे.

मृत्युमुखी पडलेल्या लोकांची नावे

  • चंदन महतो, पिता- पारस महतो

  • कमल महतो, पिता- कंसी महतो

  • धनीलाल महतो, पिता- विजय महतो

  • राजनाथ महतो, पिता- पोषण महतो

  • चंदेश्वर महतो, पिता- रामायण महतो

  • ओमनाथ महतो, पिता- भरोस महतो

  • सकलदीप महतो, पिता- भरोस महतो

  • चंदेश्वर महतो, पिता- विलास महतो

11 जण झाले आंधळे

सकलदीप महतो, भरोसा महतो, उपेंद्र महतो, धनी महतो, चंदेश्वर महतो, देवा नंद महतो, प्रेम महतो, सुपन महतो, अखिलेश महतो, लखन महतो, भोली महतो हे लोक आंधळे झाले आहे. पाच जणांवर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. येथे पोलीस अधीक्षक संतोष कुमार यांनी सांगितले की, घटनेचा तपास सुरू आहे. पोलीस आपले काम करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT