Bhupendra Patel Dainik Gomantak
देश

विधानसभा निवडणुकीआधी गुजरात सरकारचे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे 'गिफ्ट'

येत्या काही दिवसात गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

मे महिन्याची पहिली तारीख भारतातील दोन राज्यांसाठी खास आहे. या दिवशी गुजरात आणि महाराष्ट्राची (Maharashtra) स्थापना झाली होती. गुजरात सरकारने यंदाचा स्थापना दिवस लाखो लोकांसाठी खास बनवला आहे. राज्य सरकारने स्थापना दिनानिमित्त सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढवण्याची घोषणा केली आहे. (Big gift from Gujarat government to employees before Assembly elections)

लाखो लोकांना थेट फायदा
गुजरात सरकारच्या या मोठ्या घोषणेचा लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे. गुजरात राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 01 जुलै 2021 पासून वाढीव DA चा लाभ मिळेल. राज्य सरकारच्या या घोषणेमुळे सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणाऱ्या लोकांना फायदा होणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये या श्रेणीतील कर्मचारी आणि पेन्शनधारकांची संख्या 9.38 लाख आहे.

सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मागील 10 महिन्यांची थकबाकी देण्यात येणार असल्याची माहितीही राज्य सरकारने दिली आहे. पाच महिन्यांच्या थकबाकीचा पहिला हप्ता मे 2022 च्या पगार आणि पेन्शनमध्ये जोडला जाईल. त्यानंतरच्या पाच महिन्यांच्या थकबाकीचा दुसरा हप्ता जून 2022 च्या पगारासह दिला जाईल. अशाप्रकारे मे महिन्यापासून लाभार्थी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. येत्या काही दिवसात गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT