पंजाबमध्ये (Punjab) काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.  Dainik Gomantak
देश

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, नवज्योत सिंग सिद्धूंचा राजीनामा

पंजाबमध्ये (Punjab) नवीन मंत्र्यांमध्ये विभागांची विभागणी झाली आहे, आणि काही तासांनंतरच सिद्धू यांनी सोनिया गांधींना (Sonia Gandhi) आपला राजीनामा पाठवला आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाबमध्ये (Punjab) काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी काँग्रेस (Congress) अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते काँग्रेस पक्षाचे सदस्य राहतील. पंजाबमध्ये नवीन मंत्र्यांमध्ये विभागांची विभागणी झाली आहे, आणि काही तासांनंतरच सिद्धू यांनी सोनिया गांधींना (Sonia Gandhi) आपला राजीनामा पाठवला आहे.

अलीकडच्या काही दिवसांत नवज्योतसिंग सिद्धू यांच्या मान्यतेने पंजाबात घडलेल्या घडामोडीनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकण्यात आले, आणि दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबचे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "माणसाचे चारित्र्य अधःपतन तडजोडीने सुरू होते. मी पंजाबच्या भविष्याशी आणि पंजाबच्या कल्याणाच्या अजेंड्याशी तडजोड करू शकत नाही ..., मी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.... पण येथून पुढे मी काँग्रेसचीच सेवा करत राहतील ... असेही त्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT