Big blow to Congress in Kerala Chacko resigned
Big blow to Congress in Kerala Chacko resigned 
देश

केरळमध्ये कॉंग्रेसला मोठा झटका; चाको यांनी दिला राजीनामा

गोमंतक वृत्तसेवा

तिरुअमंतपुरम: आगामी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. या पाच राज्यांमध्य़े केरळचाही समावेश आहे. केरळ विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर कॉंग्रेसला केरळमध्ये मोठा झटका बसला आहे. केरळमधील कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार पीसी चाको यांनी तिकीट वाटपाच्या वादावरुन राजीनामा दिला आहे. पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी मोठ्याप्रमाणात वाढली असून काम करणं कठीण झालं आहे, असं सांगत चाको यांनी कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे.

केरळमध्ये विधानसभा निवडणूका लवकरच पार पडणार आहेत. कॉंग्रेसकडून केरळमध्ये तिकिट वाटपाची प्रक्रिया सुरु असताना पीसी चाको यांनी राजीनामा दिला आहे. चाको यांनी राजीनामा हा विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर दिल्यामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. ‘’कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना आपला राजीनामा पाठवला असल्याची माहिती चाको यांनी स्वता:हा दिली. माझ्या मनात अनेक दिवसांपासून हा विचार सुरु होता. केरळमध्ये कॉंग्रेस नाही. एक कॉंग्रेस (आय) आणि कॉंग्रेस (ए) आहे. या दोन्ही पक्षांची एक समन्वय समिती आहे. गटबाजी हा कॉंग्रेसला लागलेला मोठा शाप आहे,’’ अशी टीका पीसी चाको यांनी केली.

‘’केरळ कॉंग्रेसमध्ये आपले वर्चस्व गाजवणारे दोन गट आहेत. एका गटाचे नेतृत्व ओमेन चंडी करतात, तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथल हे करतात. असही चाको यांनी म्हटले आहे. परंतु गटबाजी हा केरळ कॉंग्रेसमध्ये मोठा अडथळा बनला आहे. केरळमध्ये चाललेल्या गटबाजीकडे आपण दिल्लीतील नेतृत्वाचं लक्ष वेधलं होतं. मात्र पक्षश्रेष्ठींनी दोन्ही गटांनी दिलेला प्रस्तावास मंजूरी दिली. केरळ कॉंग्रेसमधील गटबाजी थांबवण्यासाठी पक्षाने कोणत्याही प्रकारचे काम केले नाही. कॉंग्रेसमध्ये 90 जागा लढवणार आहे. या 90 जागांची वाटणी दोन्ही गटामध्ये करण्यात आली आहे. केरळ कॉंग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची लोकशाही राहीलेली नाही नसून उमेदवारांच्या यादीबद्दल प्रदेश समितीसोबत कोणतीही चर्चा केली नाही. सध्या कॉंग्रेससाठी काम करणं कठीण झालं आहे,’’ असंही चाको यांनी म्हटले आहे.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Lok Sabha Election 2024: ‘’चिदंबरम यांनी भ्रष्टाचार वाढवला, आरबीआयकडून सांगण्यात यायचे...’’; राजीव चंद्रशेखर यांचा हल्लाबोल

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

Heavy Rainfall in UAE: मुसळधार पाऊस अन् जोरदार वादळाने UAE पुन्हा बेहाल; उड्डाणे रद्द, इंटरसिटी बस सेवाही ठप्प

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

SCROLL FOR NEXT