NIA Dainik Gomantak
देश

Terror Funding Case: पाक समर्थित दहशतवादी संघटनांवर NIA ची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये 9 ठिकाणी छापेमारी

Terror Funding Case: श्रीनगरमध्ये दहशतवादी संघटना आणि त्यांच्या शाखांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.

Manish Jadhav

Terror Funding Case: श्रीनगरमध्ये दहशतवादी संघटना आणि त्यांच्या शाखांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी काश्मीरमध्ये नऊ ठिकाणी छापेमारी केली. एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेएम), हिज्बुल-मुजाहिदीन (एचएम), अल-बद्र आणि अल-कायदा यांसारख्या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या नव्या शाखा आणि सहयोगी आयएएफशी संबंधित हायब्रिड दहशतवादी आणि ओव्हरग्राउंड वर्कर्स (ओजीडब्ल्यू) च्या ठिकाणावर छापेमारी करण्यात आली. यादरम्यान, अनेक डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली.

एनआयएने दहशतवादविरोधी संस्थेने नोंदवलेल्या गुन्ह्याची चौकशी सुरु केली आहे. तपासादरम्यान सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी छापेमारी केली. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना आणि त्यांच्या शाखांनी बॉम्ब, आयईडी आणि लहान शस्त्रे इत्यादींचा वापर करुन जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार पसरवण्याचा प्लॅन आखला होता. ते जम्मू-काश्मीरमधील शांतता आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवण्यासाठी कट रचत होते. या दहशतवादी संघटनांमध्ये द रेझिस्टन्स फ्रंट, युनायटेड लिबरेशन फ्रंट जम्मू आणि काश्मीर, मुजाहिदीन गझवत-उल-हिंद, जम्मू आणि काश्मीर फ्रीडम फायटर्स, काश्मीर टायगर्स यांसारख्या अनेक संघटनांचा समावेश आहे.

तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न

त्यांच्या पाकिस्तानस्थित मास्टर्सच्या पाठिंब्याने या संघटना स्थानिक तरुणांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. लष्कर आणि TRF सारख्या प्रतिबंधित संघटना काश्मिरी तरुणांना जिहादच्या नावाखाली दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी भडकवण्याचा आणि प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहेत. बेरोजगार तरुणांना आकर्षित करण्यासाठी या संस्था सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत. संपूर्ण कटाचा पर्दाफाश करण्यासाठी जप्त केलेली डिजिटल उपकरणे आणि इतर डेटा तपासला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT