Jammu Kashmir Dainik Gomantak
देश

Jammu Kashmir सरकारची मोठी कारवाई, हिजबुल प्रमुखाच्या मुलासह 4 जणांची नोकरीतून हकालपट्टी

दहशतवादी सय्यद सलाहुद्दीनच्या मुलासह चार जणांना दहशतवादी संबंधांच्या आरोपावरून सरकारी नोकरीतून काढून टाकण्यात आले.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरचे उप राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दहशतवादावर मोठी कारवाई करत दहशतवादी आरोपी बिट्टा कराटेची पत्नी आणि सय्यद सलाहुद्दीनच्या मुलासह चार जणांना दहशतवादी संबंधांच्या आरोपावरून सरकारी नोकरीवरून काढून टाकले आहे. (Big action by Jammu and Kashmir government, 4 people fired from jobs along with sons of Hizbul chief)

जेकेएलएफचा सर्वोच्च दहशतवादी फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे सध्या दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. त्यांची पत्नी असबाह-उल-अर्जमंद खान या जम्मू-काश्मीर प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी होत्या आणि ग्रामीण विकास संचालनालयात त्या कार्यरत होत्या.

काश्मीर विद्यापीठात काम करणारे शास्त्रज्ञ डॉ. मुहित अहमद भट आणि वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक माजिद हुसेन कादरी आणि उद्योग आणि वाणिज्य विभागातील माहिती तंत्रज्ञानाचे व्यवस्थापक सय्यद अब्दुल मुईद यांच्या सेवाही कलम 311 अन्वये रद्द करण्यात आल्या आहेत.तसेच सय्यद अब्दुल मुईद हा पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनचा मुलगा आहे.

अधिकृत माहितीनुसार, तपासादरम्यान असे आढळून आले की बिट्टा कराटेची पत्नी असबाह ही कट्टर फुटीरतावादी असून दहशतवादी संघटना आणि आयएसआयशी त्यांचे संबंध आहेत, तिला काढून टाकण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "ती बिट्टा कराटेच्या ट्रायलच्या वेळी प्रसिद्धीच्या झोतामध्ये आली होती. त्यांना 2003 मध्ये शेर-ए-काश्मीर युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी-काश्मीरमध्ये नोकरी मिळाली आहे. तसेच त्यांची नियुक्ती दखील मागच्या दाराने झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तिच्या म्हणण्यानुसार, 2003 ते 2007 या काळात ती सतत अनेक महिने कामावर गैरहजर राहूनही तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. अखेर ऑगस्ट 2007 मध्ये त्यांची हकालपट्टी करण्यात आली. तसेच तिने सांगितले की, 'जेव्हा ती कामावर अनुपस्थित होती, तेव्हा तिने जर्मनी, यूके, हेलसिंकी, श्रीलंका आणि थायलंडचा प्रवास देखील केला होता.'

ती जेकेएलएफसाठी कुरिअर म्हणून काम करत होती, असेही तपासात समोर आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, "ती बर्‍याच ट्रिपसाठी वेगवेगळ्या विमानतळांवरून उड्डाणे घ्यायची, भारतात नेपाळ किंवा बांग्लादेशच्या रस्तांवरूनच येत होती. जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने तयार केलेल्या डॉजियरनुसार, तिने 2011 मध्ये तिची JKAS परीक्षा उत्तीर्ण केली आणि काही महिन्यांतच बिट्टा कराटेशी लग्न देखील केले.

जम्मू आणि काश्मीर प्रशासनाच्या यादीनुसार, काश्मीर विद्यापीठाच्या कॉम्प्युटर सायन्स विभागातील शास्त्रज्ञ-डी डॉ. मुहीत अहमद भट्ट यांनाही दहशतवादी संबंधांच्या आरोपावरून कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

"मुहित 2017 ते 2019 पर्यंत काश्मीर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (KUTA) चे अध्यक्ष होते तर त्याने 2016 मध्ये विद्यार्थी आंदोलन आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ज्यामध्ये अनेक तरुण मारले गेले होते," असे तपास पथकातील सदस्य असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.'

त्याच्या म्हणण्यानुसार, मुहितने दगडफेक करणाऱ्या आणि दहशतवाद्यांच्या काही कुटुंबांना कुटा निधी देखील वितरित केला होता. जानेवारी 2018 मध्ये जेके प्रशासनाच्या डॉजियरनुसार, मुहितने लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देखील केली होती.

डॉजियरनुसार त्यांनी सुरक्षा दलांनी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी निधीची व्यवस्था करून दिली होती. लेखापरीक्षण टाळण्यासाठी, कुटाने चतुराईने सोसायटी म्हणून नोंदणी टाळली मात्र, बँकिंग वाहिनीचा वापर सुरूच राहिला होता. तसेच काश्मीरमध्ये अतिरेकी विद्यार्थ्यांना आणि पाकिस्तानी प्रचाराचा प्रसार करण्यासाठी हा महत्त्वाचा दुवा मानला जातो.

माजिद हुसैन कादरी हा लष्करचा कट्टर दहशतवादी असल्याचे डॉजियरमध्ये पुढे म्हटले गेले आहे. "कादरी 2001 मध्ये काश्मीर विद्यापीठात एमबीएचे विद्यार्थी असताना ऑगस्ट 2001 मध्ये तो दोन पाकिस्तानी लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात आला आणि काश्मीर विद्यापीठातील लष्कर-ए-तैयबाचा दुवा देखील बनला."

तसेच 2002 मध्ये त्याला दहशतवाद्यांसाठी हत्यार कुरिअर म्हणून काम करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचेही डॉजियरमध्ये म्हटले आहे. 2003 मध्ये त्याला लष्कराचा प्रवक्ता बनवण्यात आले आणि जून 2004 मध्ये त्याला अटक केले. त्याच्याकडून एक स्नायपर रायफलही जप्त करण्यात आली आहे तर पीएसए अंतर्गत तो दोन वर्षे कोठडीमध्ये होता आणि नंतर न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

मार्च 2007 मध्ये त्यांची काश्मीर विद्यापीठात कंत्राटी व्याख्याता म्हणून नियुक्ती करण्यात आली तर जम्मू आणि काश्मीर प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "त्याचे भरतीचे प्रकरण चारित्र्य पडताळणीसाठी कधीही सीआयडीकडे पाठवले गेलेले नाही, आणि जे अनिवार्य आहे." 2010 मध्ये त्यांची काश्मीर विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. सध्या ते मॅनेजमेंट स्टडीज विभागात सहाय्यक प्राध्यापक देखील होते.

हिजबुल मुजाहिद्दीनचा सुप्रीम कमांडर सय्यद सलाहुद्दीनचा मुलगा सय्यद अब्दुल मुईद यालाही पदावरून हटवण्यात आले. तर मुईद जेकेईडीआय (जम्मू आणि काश्मीर उद्योजकता विकास संस्था) मध्ये आयटी व्यवस्थापक म्हणून काम करत होता.

2012 मध्ये, Mueed ला करारावर आयटी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आणि मुईदची नियुक्ती करतानाही नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. निवड समितीच्या किमान 3 सदस्यांमध्ये दहशतवाद्यांचे सहानुभूती असलेले अधिकारी समाविष्ट होते तर पुढे ते कायम करण्यात आले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांची केस देखील सीआयडी व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आली नव्हती.

सलाउद्दीनचे इतर दोन मुलगे अहमद शकील आणि शाहिद युसूफ यांचीही 2000 च्या दशकात सरकारी यंत्रणेत घुसखोरी झाली होती मात्र नंतर दोघांनाही बडतर्फ करण्यात आले आणि आता दोघेही तुरुंगात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT