iNCOVACC Intra-Nasal Vaccine Dainik Gomantak
देश

iNCOVACC Intra-Nasal Vaccine: भारत बायोटेककडून इंट्रानासल कोविड लशीला मंजुरी

iNCOVACC Intra-Nasal Covid Vaccine: भारत बायोटेकने दावा केला की, iNCOVACC ही जगातील पहिली Nasal COVID vaccine आहे.

दैनिक गोमन्तक

भारत बायोटेक (Bharat Biotech) इंटरनॅशनल लिमिटेडने (Bharat Biotech International Limited) सोमवारी म्हणजेच 28 नोव्हेंबर इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154) या नाकातून दिल्या जाणाऱ्या लशीला मंजुरी दिली आहे. इन्कोव्हॅक ही नाकातून दिली जाणारी जगातील पहिली कोविड लस बनली आहे. इंग्रजीमध्ये या लशीला Intra-Nasal Covid Vaccine म्हटले जाते.

कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रित वापरासाठी असलेल्या सर्व प्रौढांसाठी या लशीचे दोन्ही डोस प्रायमरी सीरिज आणि हेट्रोलगससाठी मंजुरी दिली आहे. याचा अर्थ भारतात 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना आपत्कालीन परिस्थितीत या लशीचा डोस दिला जाऊ शकतो. 

  • भारत बायोटेकने निवेदनात म्हटले...

भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार, स्टोरेज आणि वितरणासाठी iNCOVACC दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येते. नाकातून दिली जाणारी ही लस कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांनुसार खास डिझाइन आणि विकसित करण्यात आली आहे. अमेरिकेतील सेंट लुईस, मिसूरी येथील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या भागीदारीत ही लस (Vaccine) विकसित करण्यात आली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लशीची तीन टप्प्यांत क्लिनिकल चाचणी करण्यात आली आहे. तसेच, ही लस घेणाऱ्या व्यक्तींच्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. तसेच, यशस्वी परिणामांनंतर ही लस नाकावाटे देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. निवेदनानुसार, या लशीच्या प्रोडक्ट डेवलपमेंट आणि क्लिनिकल ट्रायलसाठी अंशतः भारत सरकारकडून निधी देण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT