Bhajan Lal Sharma  Dainik Gomantak
देश

Bhajan Lal Sharma बनले राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री; भाजपचा वसुंधराराजेंना धक्का

भाजप आमदार गटाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

Akshay Nirmale

Rajasthan New CM Bhajan Lal Sharma: मध्यप्रदेशात नवीन मुख्यमंत्री दिल्यानंतर राजस्थानातही भाजप असेच करणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर आता भाजपकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स आता संपला आहे.

राजस्थान भाजप म्हणजे वसुंधरा राजे हे समीकरण मोडीत काढत भाजपने भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले आहे. आज, मंगळवारी 12 डिसेंबर रोजी झालेल्या भाजप आमदार गटाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दरम्यान, प्रेमचंद बैरवा आणि दिया कुमार या दोघांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. तर वासुदेव देवनानी यांची विधानसभेचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, वसुंधरा राजे आणि त्यांच्या समर्थकांना मात्र हा धक्का मानला जात आहे. भाजपने पद्धतशीरपणे नव्या नेतृत्वाला वाव देताना मी म्हणजेच पक्ष असे समजणाऱ्यांनाही या निर्णयातून योग्य इशारा दिल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, जयपूर येथे प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत हायकमांडने निश्चित्त केलेल्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यावर सहमती झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार नवीन मुख्यमंत्रीपदासाठीच्या नावाचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधराराजे यांनीच दिला होता, असे सांगितले जात आहे. बैठकीपुर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती.

जयपूरमध्ये राजस्थानातील नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक झाली. यात भजन लाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भजनलाल हे संगानेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

विशेष म्हणजे, भजनलाल हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. आणि पहिल्यांदा आमदार बनल्यानंतरच त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

भजनलाल हे भरतपूरचे रहिवासी आहेत. बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. तरीही ते संगानेर येथून मोठा विजय मिळवला होता. शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांना 48081 मतांनी पराभूत केले.

भजनलाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच संघ परिवाराच्या जवळचे मानले जातात. संघटनेवरही त्यांची पकड असल्याचे सांगितले जाते.

भजन लाल शर्मा हे ब्राह्मण समाजाचे आहेत. राजस्थानात ब्राह्मण समुदायाची लोकसंख्या 7 टक्के इतकी आहे.

विशेष म्हणजे संगानेर येथून विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकिट कापून भजनलाल यांना उमेदवारी देण्यात आली होती. शर्मा हे दीर्घकाळापासून भाजप आणि संघटनेत काम करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT