Bhagwant Mann Dainik Gomantak
देश

भगवंत मान यांचा मोठा निर्णय, सरकार देणार 25 हजार सरकारी नोकऱ्या !

पंजाब सरकारच्या (Government of Punjab) पहिल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाब सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 25 हजार सरकारी नोकऱ्यांवर शिक्कामोर्तब झाले आहे. भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तरुणांमधील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. यापैकी दहा हजार नोकर्‍या पोलिस खात्यात, तर उर्वरित 15 हजार नोकर्‍या इतर वेगवेगळ्या विभागात देण्यात येणार आहेत. (Bhagwant Mann's big decision the government will give 25 thousand government jobs)

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार महिन्याभरात या नोकऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. पंजाबमधील (Punjab) निवडणुकीत AAP चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी राज्यातील सरकारी शाळा आणि रुग्णालयांची स्थिती सुधारण्याचे, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आणि 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर 18 वर्षांवरील महिलांना दरमहा 1,000 रुपये देण्याचे आश्वासनही 'आप'ने दिले होते. त्यांनी भ्रष्टाचारमुक्त सरकार आणि राज्यातील अमली पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचे आश्वासनही दिले.

शिवाय, याआधी गुरुवारी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की, ''23 मार्च रोजी 'शहीद दिनाच्या पाश्वभूमीवर राज्यात भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरु केली जाईल. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लोक भ्रष्टाचाराविरोधात तक्रारी करु शकतील.'' तत्पूर्वी 16 मार्च रोजी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नुकत्याच पार पडलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत AAP ने दणदणीत विजय मिळवत 92 जागा जिंकल्या. पंजाबच्या या दणदणीत विजयामुळे, AAP ने कॉग्रेससह भाजपला मोठा धक्का बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

SCROLL FOR NEXT