Top 7 Safe Solo Travel Destinations Dainik Gomantak
देश

Solo Travel Destinations: गोवा, मुंबई... सोलो ट्रॅव्हलर्ससाठी 'बेस्ट' 7 ठिकाणं! महिलांसाठी सुरक्षित, सोयीस्कर आहेत 'ही' पर्यटन स्थळं

Top 7 Safe Travel Destinations In India: सध्याच्या काळात महिलांमध्ये 'सोलो ट्रॅव्हल' म्हणजेच एकट्याने प्रवास करण्याची आवड प्रचंड वाढली आहे.

Sameer Amunekar

Top 7 Safe Travel Destinations In India For Solo Female Travellers

सध्याच्या काळात महिलांमध्ये 'सोलो ट्रॅव्हल' म्हणजेच एकट्याने प्रवास करण्याची आवड प्रचंड वाढली आहे. स्वतःचा शोध घेण्यासाठी, जगाची ओळख करून घेण्यासाठी आणि नवीन अनुभव घेण्यासाठी अनेक महिला आता आव्हानांचा सामना करत एकट्याने जग फिरत आहेत. मात्र, सोलो ट्रॅव्हलचा विचार करताना 'सुरक्षा' हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो.

अशाच महिला पर्यटकांच्या सुरक्षेचा आणि सोयीचा विचार करून भारतातील काही निवडक ठिकाणे ही सर्वाधिक सुरक्षित मानली गेली आहेत. चला तर मग, जाणून घेऊया अशाच ७ पर्यटन स्थळांविषयी, जिथे महिला पर्यटक आत्मविश्वासाने आणि निर्धास्तपणे आपली सुट्टी एन्जॉय करू शकतात.

हिमाचलचे नयनरम्य धर्मशाला आणि सिक्कीमची शांतता

हिमाचल प्रदेशातील धर्मशाला हे शहर हिमालयाच्या कुशीत वसलेले आहे. येथील शांत वातावरण आणि मॅक्लोडगंजमधील बॅकपॅकर संस्कृती महिला पर्यटकांना खूप आकर्षित करते. येथे जगभरातून पर्यटक येत असल्याने एकट्याने फिरणाऱ्या महिलांना येथे सुरक्षित आणि मोकळे वाटते.

तसेच, पूर्व हिमालयातील सिक्कीम हे राज्य आपल्या स्वच्छतेसाठी, येथील लोकांच्या आदरातिथ्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी ओळखले जाते. सिक्कीमची निसर्गरम्य दृश्ये, मठ आणि शांत जीवनशैली एकट्याने फिरणाऱ्या महिलांसाठी एक उत्तम 'गेटवे' आहे.

राजस्थानची शान 'उदयपूर' आणि आध्यात्मिक ऋषिकेश

'सिटी ऑफ लेक्स' म्हणून ओळखले जाणारे राजस्थानमधील उदयपूर हे शहर ऐतिहासिक वास्तू आणि शांत सरोवरांसाठी प्रसिद्ध आहे. राजस्थानच्या इतर शहरांच्या तुलनेत उदयपूर हे महिला पर्यकांसाठी खूप सुरक्षित मानले जाते. येथील स्थानिक लोक अतिशय नम्र आहेत आणि येथील जीवनशैली धकाधकीच्या शहरांपेक्षा मंद आहे.

दुसरीकडे, जगाची 'योग राजधानी' म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंडमधील ऋषिकेश हे ठिकाण अध्यात्म आणि शांततेचा शोध घेणाऱ्या महिलांसाठी एक उत्तम पर्याय आहे. गंगा नदीच्या काठी वसलेले हे शहर आणि येथील आश्रमांचे वातावरण महिलांना एक सुरक्षित अनुभव देते.

पद्दुचेरीचा फ्रेंच टच आणि गोव्यातील किनारपट्टी

दक्षिण भारतातील पद्दुचेरी हे केंद्रशासित प्रदेश भारतीय संस्कृती आणि फ्रेंच वसाहतकालीन आकर्षणाचा एक सुंदर संगम आहे. येथील 'फ्रेंच क्वार्टर' आणि शांत समुद्रकिनारे फिरण्यासाठी खूप सुरक्षित आणि सुखद आहेत.

तसेच, गोवा हे नाव काढताच डोळ्यांसमोर येतात ते समुद्रकिनारे आणि तिथली नाईटलाईफ. गोव्याची पर्यटन व्यवस्था इतकी भक्कम आहे की, तेथील वाहतूक आणि सुरक्षेबाबतची जागरूकता महिला पर्यकांसाठी सोयीची ठरते. एकट्याने फिरणाऱ्या महिलांना तिथे आराम आणि साहस यांचा समतोल साधता येतो.

मुंबई: भारतातील सर्वात सुरक्षित मेट्रो शहर

भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई हे शहर सोलो महिला पर्यकांसाठी देशातील सर्वात सुरक्षित मोठ्या शहरांपैकी एक मानले जाते. सार्वजनिक वाहतुकीची भक्कम व्यवस्था, रात्रीचे गजबजलेले भाग आणि महिलांच्या सुरक्षेसाठी असलेले भक्कम इन्फ्रास्ट्रक्चर यामुळे मुंबईत महिलांना अधिक सुरक्षित वाटते. मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे, विविध खाद्यसंस्कृती आणि समुद्रकिनारे यामुळे एकट्याने फिरणाऱ्या महिलांना येथे अनेक गोष्टी अनुभवता येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT