Best Destination For Solo Travel Dainik Gomantak
देश

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Solo Travel Destination: आजकाल एकट्याने प्रवास करण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

Sameer Amunekar

आजकाल एकट्याने प्रवास करण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. विशेषत: तरुण पिढी स्वतःच्या वेळेसाठी, स्वतःला शोधण्यासाठी आणि जीवनातील तणावातून सुटका मिळवण्यासाठी सोलो ट्रॅव्हलला प्राधान्य देत आहे. परंतु एकट्याने प्रवास करण्याच्या बाबतीत महिलांसाठी सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. वाढत्या गुन्हेगारीमुळे अनेकदा कुटुंबीय त्यांना एकट्याने प्रवासाला पाठवण्यास संकोच करतात.

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे महिला कोणत्याही भीतीशिवाय प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि महिला सुरक्षेवरील निर्देशांक (NARI) २०२५ च्या अहवालानुसार काही निवडक ठिकाणे महिलांसाठी सर्वात सुरक्षित मानली जातात. या ठिकाणी फक्त नैसर्गिक सौंदर्य आणि संस्कृतीच नाही तर स्थानिक लोकांचा स्वभाव व सुरक्षिततेसाठी असलेली व्यवस्था यामुळे महिलांना आत्मविश्वासाने फिरता येते.

महानगर असूनही मुंबई महिलांसाठी अत्यंत सुरक्षित मानली जाते. रात्री उशिरापर्यंत महिलांना येथे प्रवास करता येतो. पोलिसांचे जाळे, हेल्पलाइन नंबर, सुरक्षित सार्वजनिक वाहतूक, तसेच ओला-उबरसारख्या कॅब सुविधा यामुळे महिलांना आत्मविश्वासाने फिरता येते. जुहू बीच, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, सिद्धिविनायक मंदिर, ताज हॉटेल यांसारखी ठिकाणे पाहण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

सिक्कीममधील गंगटोक हे महिलांसाठी अतिशय सुरक्षित ठिकाण आहे. कमी गर्दी, शांत वातावरण आणि मैत्रीपूर्ण स्थानिक लोक यामुळे येथे प्रवास सुखदायी ठरतो. हिमालयाचे भव्य दृश्य, ट्रेकिंगची मजा आणि बौद्ध मठ यामुळे गंगटोक एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी आदर्श ठिकाण आहे. येथे जाण्यासाठी न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशन किंवा पाक्योंग विमानतळावरून सहज पोहोचता येते.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम हे महिलांसाठी सुरक्षित शहर मानले जाते. सुंदर समुद्रकिनारे, बंदरे, गुहा आणि ऐतिहासिक स्थळे येथे पाहण्यास मिळतात. दिवसा महिला निर्धास्तपणे फिरू शकतात, मात्र रात्री उशिरा बाहेर राहणे टाळणे चांगले. येथे रेल्वे आणि विमानसेवा दोन्ही उपलब्ध आहेत.

निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल तर उत्तराखंडमधील लॅन्सडाउन हा उत्तम पर्याय आहे. भारतीय सैन्याच्या देखरेखीखाली असलेले हे ठिकाण महिलांसाठी सुरक्षित मानले जाते. हिरवेगार डोंगर, दऱ्या, धबधबे आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या पसंतीस उतरत आहे. कोटद्वार रेल्वे स्टेशनवरून येथे सहज पोहोचता येते.

केरळमधील मुन्नार हे भारतातील सर्वात सुरक्षित हिल स्टेशनपैकी एक आहे. विस्तीर्ण चहाच्या मळ्यांमध्ये फिरणे, हिरवळीचा आनंद घेणे आणि निसर्गाच्या कुशीत वेळ घालवणे हे येथे एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरतो. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अलुवा रेल्वे स्टेशन हे मुन्नारचे जवळचे प्रमुख संपर्कस्थान आहे.

एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी भारतात आज अनेक सुरक्षित ठिकाणे उपलब्ध आहेत. मुंबईसारखे महानगर असो, गंगटोकसारखी शांत नगरी असो किंवा मुन्नारसारखे हिरवळीतले हिल स्टेशन – प्रत्येक ठिकाण महिलांना आत्मविश्वासाने प्रवास करता येईल असा अनुभव देतं. योग्य नियोजन आणि थोडी काळजी घेतल्यास महिला त्यांच्या सोलो ट्रिपचा सुरक्षित आणि आनंददायी अनुभव घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

हणजूण येथे पर्यटकांच्या वाहनाची ट्रान्सफॉर्मरला धडक; दारूच्या बाटल्या सापडल्याने संशयाचे वातावरण!

SCROLL FOR NEXT