Rs 1 Crore Cash Dainik Gomantak
देश

Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक निवडणुकीपूर्वी बंगळुरु पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटीची रोकड केली जप्त!

Manish Jadhav

Karnataka Assembly Elections: आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी, बंगळुरु पोलिसांनी सिटी मार्केटजवळ सुमारे 1 कोटी रुपयांची रोकड सापडल्यानंतर दोघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर एसजे पार्क पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सिटी मार्केटजवळील एका ऑटो रिक्षामधून रोकड जप्त करण्यात आली.

सुरेश आणि प्रवीण या दोन आरोपींकडे पैशांसंबंधीची कोणतीही कागदपत्रे नव्हती. या दोघांना एका ऑटोमध्ये पैशांनी भरलेल्या दोन बॅगांसह पकडण्यात आले.

दरम्यान, पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी, 6 एप्रिल रोजी पोलिसांनी 50 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली होती.

"पोलिसांनी (Police) गडग जिल्ह्यातील डुंडूर चेकपोस्टवर एका कारमधून (Car) दिवसभरात 50 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली," असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

तसेच, राज्यात विधानसभेच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता (MCC) लागू आहे, ज्यामध्ये योग्य कागदपत्रांशिवाय मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन जाण्याची परवानगी नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT