Hanuman Chalisa Row Dainik Gomantak
देश

Hanuman Chalisa Row: हनुमान चालिसेवरुन कर्नाटकात गोंधळ, दोन खासदार पोलिसांच्या ताब्यात

Tejasvi Surya: बेंगळुरूच्या नगरतपेट येथे झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणी हनुमान भक्तांनी आयोजित केलेल्या रॅलीमध्ये निदर्शक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली, ज्यामुळे पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारली.

Ashutosh Masgaunde

दुकानात हनुमान चालीसा वाजवल्याबद्दल बेंगळुरूमध्ये एका दुकानदाराला मारहाण झाली होती. यावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. हालसूरू गेट पोलीस स्टेशनजवळ घडलेल्या या घटनेने तीव्र निषेध केला होता. दरम्यान बेंगळुरू पोलिसांनी खासदार शोभा करंदलाजे आणि खासदार तेजस्वी सूर्या यांना ताब्यात घेतले आहे.

बेंगळुरूच्या नगरतपेट येथे झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणी हनुमान भक्तांनी आयोजित केलेल्या रॅलीमध्ये निदर्शक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली, ज्यामुळे पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारली.

गोंधळाच्या दरम्यान, ज्या दुकानदारावर हल्ला झाला होता, तोदेखील आंदोलनास उपस्थित होता. यामुळे त्यालाही अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

दोन दिवसांपूर्वी बेंगळुरूच्या नगरतपेटमध्ये मोबाईल शॉपीचा मालक मुकेश आणि त्याच्या दुकानाजवळ नमाज दरम्यान हनुमान चालीसा वाजवण्यास आक्षेप घेणाऱ्या काही लोकांमध्ये वाद झाला. वादानंतर याचे रुपांतर हाणामारीत झाले.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, मुकेशने तरुणांनी हनुमान चालीसा बंद करण्यास सांगितल्यानंतर नकार दिला. त्यानंतर तणाव वाढला, त्यांनी त्याला जबरदस्तीने त्याच्या दुकानातून बाहेर काढले आणि मारहाण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

SCROLL FOR NEXT