Crime News Dainik Gomantak
देश

Crime News: बायकोची हत्या करुन मृतदेह पंख्याला टांगला, प्रेमविवाहाचा 'रक्तरंजित' शेवट; मित्राच्या मदतीनं नवऱ्यानं काढला काटा

Bengaluru Crime News: बंगळुरुच्या राजराजेश्वरी नगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

Bengaluru Crime News: बंगळुरुच्या राजराजेश्वरी नगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. सुरुवातीला आत्महत्या वाटणाऱ्या एका प्रकरणाचा उलगडा आता एका क्रूर हत्याकांडाच्या रुपात झाला आहे. आशा नावाच्या एका विवाहितेने गळफास लावून आपले जीवन संपवले असा प्राथमिक अंदाज होता, मात्र पोस्टमार्टम रिपोर्टने पोलिसांना चक्रावून सोडले आणि तपासाची चक्रे वेगाने फिरली. या प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेचा पती विरुपाक्ष आणि त्याच्या एका मित्राला हत्येच्या आरोपाखाली अटक केली. हा कट इतका भयंकर होता की, हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी आत्महत्येचा बनाव रचला होता, मात्र वैद्यकीय तज्ज्ञांच्या एका अहवालाने या संपूर्ण पापाचा घडा फोडला.

या घटनेची पाळेमुळे आशा आणि विरुपाक्ष यांच्या प्रेमविवाहाशी जोडलेली आहेत. सुमारे सहा वर्षांपूर्वी या दोघांनी प्रेमविवाह केला होता आणि गेल्या दीड वर्षांपासून ते राजराजेश्वरी नगरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होते. मात्र, आशाचा भाऊ अरुण कुमार याने दिलेल्या तक्रारीनुसार, या सुखी संसाराला विरुपाक्षच्या बेजबाबदारपणामुळे गळती लागली होती. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच विरुपाक्ष आशाची काळजी घेत नसे. तो कोणतेही नियमित काम करत नव्हता आणि पूर्णपणे आशाच्या कमाईवर अवलंबून होता. या आर्थिक ओढाताणीसोबतच विरुपाक्षचे इतर महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधांच्या संशयावरुन त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले होते. हे वाद इतके टोकाला गेले की, गेल्या दीड महिन्यांपासून दोघेही वेगळे राहत होते आणि कौटुंबिक न्यायालयात त्यांचा घटस्फोटाचा खटलाही सुरु होता.

10 जानेवारी रोजी आशा आपल्या खोलीत साडीच्या सहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यावेळी पोलिसांनी (Police) 'अपघाती मृत्यू' अशी नोंद करुन तपास सुरु केला. दुसऱ्या दिवशी व्हिक्टोरिया रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले, तिथेच या प्रकरणाला कलाटणी मिळाली. डॉक्टरांना आशाच्या गळ्यावरील खुणा आणि मृत्यूची वेळ यामध्ये तफावत जाणवली. त्यांनी पोलिसांना दिलेल्या सविस्तर रिपोर्टने ही आत्महत्या नसून गळा दाबल्यामुळे झालेला मृत्यू असल्याचा संशय व्यक्त केला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयाची सुई विरुपाक्षकडे वळवली. 14 जानेवारी रोजी विरुपाक्ष आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

चौकशीत समोर आले की, पतीने आधी आशाचा गळा आवळून तिची हत्या केली आणि त्यानंतर आपल्या मित्राच्या मदतीने तिला पंख्याला टांगले, जेणेकरुन सर्वांना ही आत्महत्या वाटेल. या क्रूर कृत्यामागील नेमके कारण, म्हणजे मालमत्तेचा वाद, घटस्फोटाचा राग की अन्य काही, याचा शोध पोलीस घेत आहेत. 15 जानेवारी रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयात (Court) हजर करण्यात आले असून, त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण बंगळुरु शहर हादरले असून नातेसंबंधांमधील वाढता द्वेष आणि क्रूरता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

शिक्षकच आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालतात तेव्हा... सरकारी शाळांच्या विश्वासार्हतेचे काय?

बिहारचा बाहुबली ते दिल्लीचा दरबारी; नितीन नवीन यांच्या संघटनात्मक कौशल्याची आता राष्ट्रीय कसोटी- संपादकीय

SCROLL FOR NEXT