bengaluru auto driver sexually assaulted girl in night case registered Dainik Gomantak
देश

Bengaluru Crime: धक्कादायक! बंगळूरुत ऑटो चालकाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Bengaluru Crime News: कर्नाटकची राजधानी बंगळूरुमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

देशात सध्या कोलकाता येथील महिला डॉक्‍टरवरील लैंगिक अत्‍याचार आणि हत्या प्रकरण गाजत असताना कर्नाटकची राजधानी बंगळूरुमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळूरुत शनिवारी (17 ऑगस्ट) रात्री ऑटो चालकाने एका मुलीवर लैंगिक अत्याचार केला. सिलीकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळूरुतील HSR लेआउटमध्ये ही घटना घडली.

बंगळूरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा सक्रियपणे तपास सुरु आहे.

देहराडूनही हादरले!

बंगळूरुसारखीच माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना डेहराडूनमधूनही समोर आली आहे. आंतरराज्यीय बस स्टँड (ISBT) येथे उभ्या असलेल्या बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. 5 लोकांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. लाइव्ह हिंदुस्थानच्या वृत्तानुसार, पीडित तरुणी पंजाबची रहिवासी आहे. ती दिल्लीमार्गे यूपीला पोहोचली होती. जिथून ती मुरादाबादहून डेहराडूनला गेली. दरम्यान, 13 ऑगस्ट रोजी डेहराडून ISBT बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला, ज्यामध्ये 5 अज्ञात लोकांवर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ISBT कॅम्पसमधून काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, बसमधून सर्व प्रवासी उतरल्यानंतर 5 जणांनी या पीडितेवर सामूहिक अत्याचार केला, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर ते बसमधून पळून गेले. डेहराडूनच्या ISBT बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी आहे. बसस्थानकाच्या गेटला लागूनच पटेल नगर कोतवालीची ISBT पोलिस चौकी आहे. बसस्थानकावर रात्रभर लोकांची ये-जा सुरु असते. अशा स्थितीत पहाटे घडलेल्या या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT