Arpita Mukherjee
Arpita Mukherjee Dainik Gomantak
देश

SSC Scam: अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून मिळाली डायरी, मंत्र्यांचा होणार पर्दाफाश

दैनिक गोमन्तक

Bengal SSC Scam: पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या खास आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जी यांच्याकडून दोन डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या डायऱ्यांमधून पार्थ चॅटर्जी यांची काळी गुपिते बाहेर पडू शकतात. यातील एका डायरीमध्ये बँकांमध्ये रोख रक्कम जमा केल्याचा तपशील देण्यात आला आहे, तर दुसऱ्या डायरीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची नावे, रक्कम नोंदवण्यात आली आहे. या डायरीतून काही नवे घोटाळे उघडकीस येतील, अशी आशा ईडीला आहे.

दरम्यान, अर्पिता यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या दोन डायरीपैकी पहिली डायरी बंगाल सरकारच्या उच्च शिक्षण विभागाची असून ती एकूण 40 पानांची आहे, तर दुसरी डायरी एकूण 11 पानांची डायरी आहे. ईडीच्या (ED) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या डायरीमध्ये लिहिलेल्या कोडचे डिकोडिंग करण्याचे काम सुरु झाले आहे.

अर्पिताकडे पैसे कुठून आले?

आतापर्यंतच्या तपासानुसार असे आढळून आले आहे की, यापैकी एका डायरीमध्ये अर्पिता यांनी त्यांच्या बँक (Bank) खात्यात जमा करण्यासाठी वापरलेल्या रोख रकमेचा तपशील आहे. अर्पिता यांच्याकडे एवढी मोठी रक्कम कुठून आली? यावर सूत्रांनी सांगितले की, प्राथमिक तपासादरम्यान या डायरीमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या बँकांमध्ये रोख रक्कम जमा झाल्याची माहिती आहे. ही रोकड लाखात आहे.

ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अर्पिता यांना कोणीतरी वेगवेगळ्या तारखांना एवढी मोठी रक्कम का देईल? या संदर्भातील खुलासा ईडीच्या ताब्यात असलेल्या अर्पिता यांच्या चौकशीतून होऊ शकतो. यासोबतच दुसऱ्या डायरीत लिहिलेल्या नावांचीही चौकशी करण्यात येत आहे. त्यानुसार अर्पिता यांचे कोणा-कोणाशी संबंध आहेत, तसेच डायरीत लिहिलेल्या रकमेशी या लोकांचा काय संबंध आहे, याचा शोध घेतला जात आहे.

मंत्री आणि अभिनेत्रींची स्वतंत्रपणे चौकशी का केली जात आहे?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात अर्पिता आणि अटक करण्यात आलेले मंत्री पार्थ चॅटर्जी यांची स्वतंत्रपणे चौकशी केली जात आहे. यानंतर दोघांची एकत्र बसून चौकशी केली जाणार आहे, जेणेकरुन डायरीत दडलेल्या गुपितांसोबतच या प्रकरणात काही नवीन घोटाळेही समोर येऊ शकतील.

दुसरीकडे, आतापर्यंतच्या तपासादरम्यान ईडीला त्यांच्या परदेश प्रवासाचीही माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. चौकशीदरम्यान दोघांच्या पासपोर्टच्या आधारे चौकशी केली जाईल, तसेच अर्पिता यांनी परदेशात जाण्यासाठी पैसे कोठून आणले याची विचारणा देखील केली जाईल.

अर्पिता यांच्या ठिकाणाहून ईडीने काय जप्त केले?

शिवाय, आतापर्यंतच्या चौकशीदरम्यान अर्पिता यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. या खुलाशांबाबत मंत्री पार्थ चॅटर्जी यांची चौकशी सुरु आहे. येत्या काही दिवसांत याप्रकरणी आणखी काही जणांना अटक केली जाऊ शकते. तसेच काही लोकांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. ईडीने अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून 21 कोटींहून अधिक रक्कम आणि दागिने जप्त केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

Goa Election 2024 Voting Live: राज्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

China Crime: धक्कादायक! चीनमध्ये माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू; तर 23 जण जखमी

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Israel Hamas War: रफाह शहराच्या सीमेजवळ इस्त्रायलची मोठी तयारी; ‘हा’ मुस्लिम मित्र देश संतापला; नेतन्याहू यांना दिला इशारा

SCROLL FOR NEXT