Belgaum was hit by unseasonal rains, trees fell and school roof collapsed Dainik Gomantak
देश

बेळगावला अवकाळी पावसाचा तडाखा, झाडांची पडझड, शाळेचे पत्रे कोसळले

अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोर धरला आहे

दैनिक गोमन्तक

बेळगावमध्ये अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी अनेक झाडांची पडझड झाली. अनेक ठिकाणी रोडच्या कडेला असणारी झाड देखील उन्मळून पडली. त्यामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण झाली होती. बेळगावमधील (belgaum) काही भागातील घरांची आणि शाळेचे पत्रे देखील वाऱ्यामुळे उडाली आहेत. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे अनेकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, बुधवारी सायंकाळी डिचोली शहरासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची वृष्टी झाली. पावसावेळी सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे डिचोली शहरासह अनेक भागात दाणादाण उडाली. झाडांची पडझड होताना मयेसह (mayem) दोनठिकाणी घरांवर झाडे कोसळली. डिचोलीच्या साप्ताहिक बाजारावरही परिणाम झाला. सायंकाळी साधारण सहा वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. साधारण पाऊण तास पर्जन्यवृष्टी झाली. पावसामुळे रस्त्यावर पाणी झाले. बहूतेक भागात वीज (power) पुरवठाही खंडित झाला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काही भागात काळोखाचे साम्राज्य पसरले होते. पावसामुळे हजारो रुपयांची वित्तहानी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.


घरावर झाड कोसळले

आजच्या पावसावेळी सुटलेल्या जोरदार वाऱ्यात विविध ठिकाणी झाडांची पडझड झाल्याची माहिती मिळाली आहे. चिंच भटवाडी-मये येथे सत्यवान पेडणेकर यांच्या घरावर भलामोठा आम्रवृक्ष कोसळल्याने घराची मोडतोड झाली. या घटनेत पेडणेकर यांची हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसऱ्या एका घटनेत पुनर्वसन वसाहत-साळ येथे एका घरावर माड कोसळला. डिचोली (Bicholim) अग्निशमन दलाला या घटनांची माहिती मिळताच दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रात्री उशीरापर्यंत मदतकार्य चालू होते. अन्य घटनेत बोर्डे येथे लोकवस्तीत माड तर काही ठिकाणी झाडांच्या फ़ांद्याची पडझड झाल्याचे वृत्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT