Brother murdered in Belgaum Dainik Gomantak
देश

Belgaum Crime: दारुच्या नशेत शिवीगाळ करत अंध आईकडे जेवण मागितले, मोठ्या भावाने लहान भावाला संपवले

Belagavi Crime News: दोघेही गवंडी काम करुन उदरनिर्वाह करतात अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, दोघानांही दारुचे व्यसन असल्याने घरात सतत वाद व्हायचे.

Pramod Yadav

बेळगाव: लहान भावाने दारुच्या नशेत अंध आईशी भांडण करुन शिवीगाळ करत जेवण मागितले. मोठ्या भावाला राग अनावर झाल्याने लोखंडी रॉड डोक्यात घालून लहान भावाचा खून केला. धामणे, बेळगाव येथे बुधवारी (१६ एप्रिल) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

लक्ष्मण बाळेकुंद्री (वय २८, रा. बसवाण गल्ली, धामणे) असे खून करण्यात आलेल्या लहान भावाचे नाव आहे. तर, मारुती भरमा बाळेकुंद्री (वय ३०, रा. धामणे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. दोघेही गवंडी काम करुन उदरनिर्वाह करतात अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, दोघानांही दारुचे व्यसन असल्याने घरात सतत वाद व्हायचे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण बुधवारी दुपारी मद्य पिऊन घरी आला होता. लक्ष्मणने घरी येताच आईशी वाद घातला तसेच शिवीगाळ करत जेवण वाढ म्हणू लागला. यावेळी मोठा भाऊ मारुती देखील घरीच होता. थांब मीच तुला जेवण देतो, असे म्हणत मारूतीने लक्ष्मणच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. एवढेच नव्हे तर खुरप्याने लक्ष्मणवर वार देखील केले. यात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मणचा मृत्यू झाला.

दोघेही भाऊ नेहमी मद्याच्या नशेत असतात. तर, त्यांच्या आईला अंधत्व आले आहे. घटनेनंतर मारुती त्याचठिकाणी बसून होता. वडगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मारुती बाळेकुंद्री याला अटक केली आहे. वडगाव पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT