Brij Bhushan Sharan Singh Dainik gomantak
देश

माफी मागा, तरच उत्तर प्रदेशात प्रवेश; ब्रिजभूषण सिंह

राज ठाकरेंनी अयोध्या यात्रेपूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी - रामदास आठवले

Sumit Tambekar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जून रोजीचा अयोध्या दौरा करण्यात आला होता. अखेर तो स्थगित करण्यात आल्याची माहिती दिली होती. राज ठाकरे यांनी ट्विट करत आपला दौरा स्थगित करण्यात आल्याचं जाहीर केलं होतं.यावेळी त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव हा दौरा स्थगित करण्यात आल्याच म्हटलं होतं . पण, उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी अयोध्येत येण्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांनी उत्तर भारतीयांचा "अपमानित" केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे. (Before coming to Ayodhya, Raj Thackeray should apologize to the North Indians )

जोपर्यंत राज ठाकरे जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत उत्तर प्रदेशात जाऊ देणार नाही, असे भाजप खासदाराने म्हटले होते. मात्र, अयोध्या यात्रा पुढे ढकलण्यामागील कारणांची माहिती राज ठाकरेंनी दिलेली नाही. राज ठाकरेंच्या दौऱ्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि मंत्री आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, शिवसेनेने याबाबत अद्याप काहीही जाहीर केलेले नाही.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ते 22 मे रोजी पुण्यात रॅली घेणार आहेत आणि यावेळी ते त्यांच्या अयोध्या दौऱ्याशी संबंधित माहिती देणार आहेत. याआधी एप्रिलमध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा 'अल्टीमेटम' दिला होता, त्यानंतर त्यांना धमकीचे पत्र आले होते.

या दरम्यान राज ठाकरेंनी अयोध्या यात्रेपूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी असे केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मनसेने 2008 मध्ये 'मराठी माणूस'ला पाठिंबा देत आंदोलन सुरू केले होते, त्यादरम्यान कल्याण, मुंबई येथे रेल्वे परीक्षा देण्यासाठी आलेल्या उत्तर भारतातील उमेदवारांवर हल्ला करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT