Before 3 years old There was big accident on railway track during Chhath Puja in Amritsar
Before 3 years old There was big accident on railway track during Chhath Puja in Amritsar Dainik Gomantak
देश

Chhath Puja 2021: अमृतसरमध्ये रेल्वे ट्रॅकवर मोठा अपघात झाला होता म्हणून यावेळी...

दैनिक गोमन्तक

सुमारे 3 वर्षांपूर्वी, अमृतसरमध्ये रेल्वे ट्रॅकवर एक अपघात झाला होता, ज्यामध्ये रावण दहन पाहणासाठी आलेल्या अनेक लोकांना ट्रेनने उडवले होते. तिथे लोक रेल्वे रुळावर उभे राहून रावण दहन पाहत होते. या घटनेनंतर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या सर्व प्रार्थनास्थळे आणि धार्मिक स्थळांवर खबरदारी घेणे सुरू झाले.

यावेळीही छठ महापर्वाच्या (Chhath Puja) पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील चंदौली येथे रेल्वे लाईनच्या काठावर असलेल्या अशा तलावांवर विशेष दक्षता घेण्यात येत आहे, जिथे छठ पूजा केली जाते. अशा ठिकाणी गाड्यांचा वेग कमी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच गाड्या सतत हॉर्न वाजवून पुढे जातील. एवढेच नाही तर प्रत्येक क्रॉसिंगजवळ स्थानिक पोलिसांसह सरकारी रेल्वे पोलिस आणि आरपीएफचे जवानही तैनात असतील.

विशेष म्हणजे पूर्व उत्तर प्रदेशातील चंदौली आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये हा लोकश्रद्धेचा सण विशेष पद्धतीने थाटामाटात साजरा केला जातो. अशा स्थितीत घाटांवर भाविकांची मोठी गर्दी होते. चंदौली जिल्ह्यातील दीनदयाल नगरसह अशी अनेक छठ प्रार्थनास्थळे आहेत, जी रेल्वे लाईनला लागून आहेत. अशा परिस्थितीत ही गर्दी रेल्वे रुळाच्या दिशेने जाऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि रेल्वेने संयुक्तपणे नियोजन केले असून, या ठिकाणांहून जाणाऱ्या गाडय़ांचा वेग कमी करण्यात येणार आहे. रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणीही पोलिसांचा चोख बंदोबस्त असेल.

छठपूजेच्या ठिकाणी स्वच्छतेचे काम पूर्ण

यासोबतच जिल्हा प्रशासनाने छठपूजेच्या सर्व ठिकाणच्या स्वच्छतेचे काम पूर्ण केले आहे. जिल्हा प्रशासनाकडून घाटांवर रोषणाईचीही योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे गर्दी नियंत्रण आणि वाहतूक नियंत्रणासोबतच भाविकांच्या सुरक्षेसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक प्रार्थनास्थळावर जिल्हा प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT