Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

BBC Documentary वरील बंदी उठवण्यास SC चा नकार, सरकारकडे मागितली कागदपत्रे

Manish Jadhav

BBC Documentary: 2002 च्या गुजरात दंगलीवरील बीबीसी डॉक्युमेंटरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण केली आहे. डॉक्युमेंट्रीवरील तात्काळ बंदी उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावून या प्रकरणातील मूळ कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. यासाठी सरकारला तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी एप्रिलमध्ये होणार आहे.

दरम्यान, बीबीसीच्या डॉक्युमेंटरीच्या सोशल मीडिया लिंकवर बंदी घालण्याच्या आदेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण केली आहे. बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवरील बंदी तात्काळ उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला.

सोबतच या प्रकरणी केंद्र सरकारला (Central Government) नोटीसही बजावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला या प्रकरणातील मूळ कागदपत्रे तीन आठवड्यांत सादर करण्यास सांगितले असून पुढील सुनावणी एप्रिल महिन्यात होणार आहे.

तसेच, पत्रकार एन राम, टीएमसी खासदार महुआ मोईत्रा आणि वकील प्रशांत भूषण यांनी संयुक्तपणे दाखल केलेल्या याचिकेवर कोणताही अंतरिम आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT