Bathinda Military Station Firing Dainik Gomantak
देश

Bathinda Military Station Firing: भटिंडा मिलिटरी स्टेशन गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा...

भटिंडा मिलिटरी स्टेशनवर झालेल्या गोळीबारात 4 जवान शहीद झाल होते.

Puja Bonkile

Bathinda Military Station Firing: पंजाबमधील भटिंडा मिलिटरी स्टेशनवर झालेल्या गोळीबाराबद्दल मोठा माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेत जवानच आरोपी निघाला आहे.

एवढेच नाही तर मिलिटरी स्टेशनच्या आत झालेल्या गोळीबारात कोणताही दहशतवादी नव्हता अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.

या संपूर्ण घटनेचा अंदाज लष्कराच्या एका जवानानेच वर्तवला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपी जवानानेही आपला गुन्हा मान्य केला आहे.

या घटनेच्या संदर्भात आर्टिलरी युनिटमधील गनर देसाई मोहन याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मुख्यालयाच्या दक्षिण पश्चिम कमांडकडून देण्यात आली.

सतत चौकशी केल्यानंतर, गनर देसाई मोहनने इन्सास रायफल चोरण्यात आणि त्याच्या चार साथीदारांची हत्या करण्यात सहभाग असल्याचा गुन्हा कबुल केला आहे.

लष्कराकडून सांगण्यात आले आहे की, प्राथमिक तपासात वैयक्तिक कारणामुळे त्याने ही घटना घडवून आणल्याचे समोर आले आहे. 

साउथ वेस्टर्न कमांडने पुढे माहिती दिली की ती व्यक्ती सध्या पोलिस कोठडीत आहे आणि अधिक तपशील शोधला जात आहे.

यासोबतच लष्कराने सांगितले की, 'आधी अनुमान केल्याप्रमाणे कोणताही दहशतवादी कोणी नसल्याचा पुनरुच्चार केला जात आहे.' 

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी घडलेल्या या घटनेसंदर्भात चार जवानांची चौकशी करण्यात आली.

भटिंडा मिलिटरी स्टेशनवर झालेल्या गोळीबार प्रकरणी पंजाब पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गोळीबाराच्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी मेजर आशुतोष शुक्ला यांच्या वक्तव्याच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT