Four Killed in Firing incident at Bathinda Military Station: पंजाबमधील भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळीबार झाला आहे. या घटनेत चार जवान शहीद झाले आहेत. ही घटना सकाळी 4.35 घडली आहे.
गोळीबाराचे कारण अद्याप शोधले जात आहे. त्याचबरोबर शोध मोहीमही सुरू आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
दुसरीकडे, भटिंडाचे एसएसपी जीएस खुराना यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, हा दहशतवादी हल्ला नाही. आत काहीतरी प्रकरण आहे.
आमची टीम बाहेर वाट पाहत आहे. सध्या लष्कराने आम्हाला आत जाण्याची परवानगी दिलेली नाही.
भटिंडा मिलिटरी स्टेशन शहराला लागून आहे. हे एक जुनं आणि खूप मोठं मिलिटरी स्टेशन आहे.
पूर्वी ते शहरापासून थोडं लांब होतं, परंतु शहराच्या विस्तारामुळं आता मिलिटरी स्टेशन रहिवासी भागाच्या जवळ आलं आहे. या मिलिटरी स्टेशनच्या बाहेर कोणत्याही सामान्य वाहनानं जाता येतं.
आर्मी कॅंट भटिंडा जिओ मेसमध्ये गोळीबार झाल्याची माहिती पंजाब पोलिसांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. आर्मी कॅन्टचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत.
सुमारे 2 दिवसांपूर्वी इंसास रायफलसह 28 काडतुसेही गायब झाली होती. या घटनेमागे लष्कराचे काही जवान असू शकतात. सध्या लष्कराने स्थानिक पोलिसांना कॅन्टोन्मेंट परिसरात जाण्यास मनाई केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.