Minor Girl Sexual Assault Case Dainik Gomantak
देश

Minor Girl Sexual Assault Case: शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना! निष्पाप चिमुरडीवर वासनांध मुख्याध्यापकाचा अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Ballia School Principal Arrested: उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून माणुसकीला लज्जित करणारी एक धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

Minor Girl Sexual Assault Case: उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून माणुसकीला लज्जित करणारी एक धक्कादायक घटना समोर आली. जिल्ह्यातील सिकंदरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिवान कला येथील एका शाळेत मुख्याध्यापकानेच विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.

मिळालेल्या माहितीनुसार, सिवान कला येथील शाळेत कार्यरत असलेला आरोपी मुख्याध्यापक फैजुल्लाह अंसारी हा गेल्या अनेक दिवसांपासून एका निष्पाप चिमुरडीला आपल्या वासनेचा शिकार बनवत होता. आरोपी मुख्याध्यापक या विद्यार्थिनीला चॉकलेटचे आमिष दाखवून शाळेच्या स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर अत्याचार करायचा. ही धक्कादायक बाब तेव्हा उघड झाली जेव्हा पीडित मुलीची प्रकृती खालावली आणि तिने आपल्या कुटुंबाला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीची आपबीती ऐकून कुटुंबियांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी मुख्याध्यापक फैजुल्लाह अंसारी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत नराधम मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. या प्रकरणाची माहिती देताना रसडा क्षेत्राधिकारी आलोक गुप्ता यांनी सांगितले की, मुलीच्या तक्रारीच्या आधारे सुसंगत कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

एका निष्पाप मुलीसोबत घडलेल्या या अघोरी गुन्ह्यामुळे स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेता पोलीस प्रशासनाने परिसरात सतर्कता वाढवली असून शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले असून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या घटनेने शिक्षण क्षेत्रातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT