Azam Khan Dainik Gomantak
देश

'...एनकाउंटर होऊ शकतो': आझम खान

आझम खान (Azam Khan) यांची तब्बल 27 महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका झाली.

दैनिक गोमन्तक

आझम खान यांची तब्बल 27 महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर ते रामपूरमधील आपल्या निवासस्थानी पोहोचले. रामपूरला पोहोचण्यापूर्वी आझम खान यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. घरी पोहोचल्यानंतर आझम यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आझम यांनी त्यांच्या 40 वर्षांच्या राजकीय प्रवासाची कहाणीही सांगितली. यासोबतच अखिलेश यांचेही नाव न घेता निशाणा साधला. आझम खान यांनी तुरुंगात मिळणाऱ्या उघड धमक्यांचाही उल्लेख यावेळी बोलताना केला. याशिवाय जामीन मिळाल्याबद्दल आझम यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानले. (Azam Khan said that while in jail the police had told him to stay underground in Rampur after his release)

दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर घरी पोहोचलेल्या आझम खान यांनी तुरुंगात पोलीस कर्मचाऱ्याला मिळालेल्या धमकीचाही खुलासा केला. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्वत:च्या एनकाऊंटरबद्दल सांगितले. ते म्हणाले की, 'मी तुरुंगात असताना माझे म्हणणे ऐकून घेण्यासाठी एक अधीक्षक आले होते.' यावेळी इन्स्पेक्टर म्हणाले होते की, 'सुरक्षित राहा. जामीन मिळाल्यावर रामपूरला (Rampur) गेलात तर अंडरग्राऊंड राहा. तुमचा एनकाऊंटर होऊ शकतो.' पत्रकारांशी संवाद साधताना आझम यांनी अखिलेश यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'अखिलेश यादव (Akhilesh Yadav) हे माझे नेते नाहीत. मात्र, काही प्रकरणांत आझम खान यांनीही अखिलेश यादव यांच्यावर मौन बाळगले. यावेळी आझम यांनी अखिलेश यांची खिल्लीही उडवली. दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर आझम खान म्हणाले, 'मी विवेक विकणारा नाही. भाजप (BJP), बसपा आणि काँग्रेस (Congress) हा माझ्यासाठी मोठा प्रश्न नाही.'

तसेच, आपल्या 40 वर्षांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना आझम खान म्हणाले की, 'माझे ध्येय राजकारण नव्हते. मला सोन्या-चांदीची हाव नव्हती.' शहराच्या दुरवस्थेचा संदर्भ देत ते म्हणाले की, 'रामपूर नगरपालिकेच्या इमारतीची काय अवस्था झाली ते तुम्ही बघू शकत नाही. आम्ही अशाप्रकारे रामपूर शहराची रचना नव्हती केली.' 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात यापूर्वीही तुरुंगात गेल्याचे त्यांनी सांगितले. बनारसच्या तुरुंगात त्यांनी अडीच वर्षे वास्तव्य केले आहे. ते पुढे म्हणाले, 'सीतापूर कारागृहात ज्या बॅरेकमध्ये मला 27 महिने ठेवण्यात आले होते, त्या बॅरेकमध्ये दोन-तीन दिवसांत ज्यांना फाशी होणार होती, त्यांनाच ठेवण्यात आले होते.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Hamas War: क्रीडाविश्वात खळबळ, इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू

Mopa Airport: उबर अ‍ॅपद्वारे भाडे घेणाऱ्या 4 जणांवर वाहतूक विभागाची कारवाई

Bicholim: डिचोलीत दोन विद्यार्थ्यांमध्ये मारामारी, व्हॉट्सअप ग्रुपवर चॅटिंग करताना झाला होता वाद, एकास अटक

Panjim: "गोव्यातील कलाकारांनाही मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी द्यावी", CM सावंतांचे प्रतिपादन

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

SCROLL FOR NEXT