Shri Ram Temple Ayodhya  Dainik Gomantak
देश

Ayodhya: राम मंदिरात 2023 अखेरीपासून दर्शन; 2025 ला बांधकाम होईल पुर्ण

Ayodhya: बांधकाम सुरु असतानाच सुरु होऊ शकते भाविकांना दर्शनासाठी खुले होऊ शकते मंदीर.

दैनिक गोमन्तक

अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरात ( Shri Ram Temple), 2023च्या डिसेंबर महिन्यापासून सामान्य लोकांसाठी दर्शन सुरू होणार आहे. राम मंदिर ट्रस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025 पर्यंत राम मंदिराच्या बांधकामाचे काम पूर्ण होईल. मागील वर्षी 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाचे लोकार्पण केले. मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरु असतानाच दर्शन सुरु होणार आहे. राम मंदिराच्या बांधकामात स्टील आणि विटांचा वापर केला जात नाही. विशेष म्हणजे, मुख्य मंदिराचे बांधकाम 5 एक्कर जमिनीवर केले जाईल, तसेच उर्वरित जमिनीवर संग्रहालय आणि ग्रंथालय इत्यादी केंद्रे बांधले जाणार आहेत.

मंदिराच्या बांधकामाशी संबंधित उपक्रम सुरू करण्यापूर्वी, ट्रस्टसमोर मुख्य आव्हान हे होते की मंदिराची रचना निश्चित करणे जेणेकरून त्याला प्राचीन मंदिराचे स्वरूप देता येईल. मंदिराच्या बांधकामात स्टीलचा वापर केला जाणार नाही हे सुद्धा ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले होते की अयोध्येचे राम मंदिर भारताच्या प्राचीन बांधकाम पद्धतीनुसार बांधले जात आहे. जेणे करुन भूकंप, वादळ किंवा इतर कोणत्याही आपत्तीमध्येही मंदीराचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

विशेष म्हणजे, राम मंदिर परिसर 70 एकर ते 107 एकर पर्यंत विस्तारण्याच्या योजनेचा भाग म्हणून, 'राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र' ने या वर्षी फेब्रुवारीमध्ये राम जन्मभूमी संकुलाजवळ 7,285 चौरस फूट जमीन खरेदी केली आहे. ट्रस्टच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार मंदिर बांधणाऱ्या ट्रस्टने 7,285 चौरस फूट जमीन खरेदीसाठी 1,373 रुपये प्रति चौरस फूट दराने 1 कोटी रुपये दिले आहेत.

रजिस्ट्रार एस.बी. सिंह यांनी सांगितले होते की, जमीन मालक दीप नारायण यांनी 20 फेब्रुवारी रोजी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांच्या बाजूने 7,285 चौरस फूट जमिनीच्या रजिस्ट्रीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती. मिश्रा आणि अपना दलाचे आमदार इंद्र प्रताप तिवारी यांनी साक्षीदार म्हणून कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. ही रजिस्ट्री फैजाबादचे उपनिबंधक एस.बी.सिंह यांच्या कार्यालयात करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

SCROLL FOR NEXT