Attack On Owaisi  Dainik Gomantak
देश

Attack On Owaisi : 'संधी मिळाली असती तर सप्टेंबरमध्येचं हल्ला झाला असता'

दोन्ही आरोपींना आता पोलीस कोठडीत ठेवण्याची तयारी सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हापूरच्या छिजारसी टोलनाक्यावर हल्ला झाला यातून ते बचावले आहेत, आम्हाला आधीच संधी मिळाली असती, तर सप्टेंबर महिन्यातच हा हल्ला झाला असता अशी कबुली त्यांनी दिली आहे. ते अधिक प्राणघातक ठरले असते अशी माहिती त्यांनी चौकशीदरम्यान मुख्य आरोपी सचिन शर्मा आणि त्याचा साथीदार शुभम याने पोलिसांना तपासात दिली. सध्या कारागृहात रवानगी झालेल्या दोन्ही आरोपींना आता पोलीस (police) कोठडीत ठेवण्याची तयारी सुरू आहे.

गुरुवारी हापूरच्या छिजारसी टोलवर असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर ज्या दोन शस्त्रांनी गोळ्या झाडल्या होत्या, ते शस्त्र मेरठच्या किथोर पोलीस स्टेशन हद्दीतील राधना गावातून खरेदी करण्यात आल्या होत्या. मुख्य आरोपी सचिन शर्माकडून एक 9 एमएम पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत, तर शुभमकडून 32 बोअरचे रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही आरोपींच्या प्राथमिक चौकशीत या हल्ल्यामागे अन्य कोणाचीही भूमिका नसल्याचे स्पष्ट झाले. मुख्य आरोपी सचिन शर्माने या संपूर्ण घटनेची योजना आखली आणि त्याचा मित्र शुभमला सोबत घेतले.

सचिनने यापूर्वीही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. सचिन शर्मानेही 3 ते 4 वेळा प्रयत्न केले. ओवेसींच्या सभांना अनेकवेळा पोहोचलो, गर्दीत त्यांच्यापर्यंत पोहोचलो, पण संधी मिळाली नाही. चौकशीदरम्यान सचिन शर्माने ही माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT