Atishi Marlena Dainik Gomantak
देश

Delhi Excise Policy Case: ''त्यांना जीवे मारण्याचा रचला जातोय कट''; CM केजरीवाल यांच्याबाबत आतिशी यांचा मोठा दावा

Delhi CM Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद आहेत.

Manish Jadhav

Delhi Excise Policy Case: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर देशातील राजकारण वेगाने बदलत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली. त्यानंतर लगेचच दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली.

दरम्यान, सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद आहेत. केजरीवाल यांच्या याचिकेवर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी सुरु असताना, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दावा केला की, त्यांना मधुमेह असून ते घरी बनवलेले खाद्यपदार्थ खात आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळवण्यासाठी जाणूनबुजून ते गोड खात आहेत. याबाबत केजरीवाल सरकारमधील मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला. अतिशी म्हणाल्या की, भाजप आणि पंतप्रधान मोदी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचत आहेत.

"30 वर्षांपासून मधुमेहाचा आजार"

दरम्यान, केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचे आतिशी यांनी सांगितले. आतिशी म्हणाल्या की, "अरविंद केजरीवाल यांना 30 वर्षांपासून मधुमेहाचा त्रास आहे. ते रोज 54 युनिट्स इन्सुलिन घेतात. न्यायालयानेही त्यांना घरचे जेवण घेण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ईडी आणि भाजप त्यांना घरचे जेवण घेण्यापासून रोखत आहे. केजरीवाल मुद्दाम गोड चहा आणि मिठाई खात असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले. मधुमेहाच्या रुग्णांना नेहमी टॉफी आणि केळी ठेवण्यास सांगितले जाते.''

"तिसरे खोटे - रोज आलू-पुरी खातात"

अतिशी यांनी पुढे सांगितले की, "तिसरे खोटे, ते रोज आलू-पुरी खातात. ईडीने न्यायालयात सादर केलेल्या डाएट चार्टमध्ये ते दिवसातून एकदा आलू-पुरी खात असल्याचा उल्लेख केलेला आहे. 1 फेब्रुवारीपासून ते इन्सुलिन रिव्हर्सल प्रोग्राम करत आहेत. पण 21 मार्चला अटक झाल्यापासून त्यांचा हा प्रोग्राम थांबला. गेल्या अनेक दिवसांपासून शुगर लेव्हल 300 हून अधिक वाढली आहे, पण तुरुंग अधिकारी इन्सुलिन देत नाहीत. त्यांना तिहारमध्ये जेवण देऊन मारण्याचा कट रचला जात आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT