Atique Ashraf Murder Daiinik Gomantak
देश

Atique Ashraf Murder Case: अतिक-अश्रफ खून प्रकरणामागे मोठा कट! 'या' 5 गोष्टी सूचित करतात...

Atique Ahmed Killing: उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची काल रात्री प्रयागराजमध्ये हत्या करण्यात आली.

Manish Jadhav

Atique Ahmed Killing: उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची काल रात्री प्रयागराजमध्ये हत्या करण्यात आली.

तीन हल्लेखोरांनी पोलिसांसमोरच अतिक आणि अश्रफ यांच्यावर गोळ्या झाडल्या. एवढेच नाही तर तिन्ही हल्लेखोरांनी हत्येनंतर लगेचच घटनास्थळी शरणागती पत्करली.

अतिक आणि अश्रफ यांच्या आजूबाजूला अनेक सुरक्षा कर्मचारी होते, पण त्यांना हल्लेखोरांपासून वाचवता आले नाही.

अतिक आणि अश्रफ यांचा जागीच मृत्यू झाला. अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येमागे हल्लेखोरांचा हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दोघांच्या हत्येमागे मोठा कट असल्याची चिन्हे आहेत. चला जाणून घेऊया षड्यंत्राच्या या 5 गोष्टींबद्दल.

अतिक-अश्रफ यांच्या हत्येमागे मोठा कट आहे का?

1. हल्लेखोरांना सुपारी दिली असेल

अतिक आणि अश्रफ यांचे मारेकरी ज्या पद्धतीने गोळीबार करताना दिसले त्यावरुन त्यांना बंदुका वापरण्याचे प्रशिक्षण दिल्याचे स्पष्ट होते. कदाचित कोणीतरी हल्लेखोरांना हत्येसाठी सुपारी दिली असावी.

2. रहस्य उघड होण्याची भीती

अतिक अहमदचे साम्राज्य 40 वर्षांहून अधिक जुने होते, त्याचे सर्व नेते आणि मोठ्या लोकांशी संबंध होते. रहस्य उलगडण्याच्या भीतीने दोघांची हत्या झाल्याची शक्यता आहे. पोलीस (Police) आणि एटीएसच्या चौकशीत अतिक अहमद आणि अश्रफ यांनी यापूर्वीही अनेक खुलासे केले होते.

3. हत्येचे पूर्व नियोजन

अहमद आणि अश्रफ यांची हत्या करणाऱ्या पत्रकारांच्या वेशात अतीक आला होता. तो सहा महिन्यांपूर्वी यूट्यूब चॅनल चालवत होता. तो बराच काळ अतिकच्या हालचालींचा पाठपुरावा करत असल्याचे समजते. फुल प्रूफ प्लॅनिंग करुन खून झाल्याची शक्यता आहे.

4. आयएसआय-लष्कर संबंधांचा खुलासा

अलीकडेच, चौकशीदरम्यान अतिकचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर यांच्याशी संबंध असल्याचे समोर आले होते. अतीकने आणखी मोठी गुपिते उघड केली नसण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली.

5. यूपीमध्ये हाय अलर्ट

अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येनंतर संपूर्ण यूपीमध्ये हाय अलर्ट आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडवण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली असण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

SCROLL FOR NEXT