Atique Ahmed Murder Case: अतिक अहमद हत्या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट म्हणजे शूटर्संना पिस्तूल देणाऱ्या सोढीचा मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शूटर्संना हे पिस्तूल मेरठमधून मिळाले होते. शूटर्संना शस्त्रे मिळवून देण्यात सोढीची महत्त्वाची भूमिका होती.
दरम्यान, माफिया अतिक अहमदला त्याच्या हत्येची आधीच भीती वाटत होती. 11 एप्रिल रोजी, अतिक अहमदला यूपीमध्ये आणले जात असताना, त्याने सांगितले होते की, त्यांचा हेतू योग्य नाही. आपल्याला ठार मारायचे आहे.
माफिया अतिक अहमदचा भाऊ अश्रफ याला त्याच्या हत्येची तारीख माहीत होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, कारण 29 मार्च रोजी अश्रफने पोलीस कोठडीत दिलेल्या जबाबात एका पोलीस (Police) अधिकाऱ्याने आपल्याला दोन आठवड्यांत तुरुंगातून बाहेर काढून कारवाई करु, अशी धमकी दिली होती.
अतिक अहमद आणि अश्रफ यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
अधिवक्ता विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
एवढेच नाही तर, याचिकेत 2017 पासून यूपीमध्ये झालेल्या 183 चकमकींची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली तज्ज्ञ समितीमार्फत करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
त्याचवेळी, यूपी सरकारच्या गृह विभागाने माफिया अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येप्रकरणी 3 सदस्यांची न्यायालयीन चौकशी केली आहे.
हा आयोग 2 महिन्यांत चौकशी अहवाल देईल. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरविंद कुमार त्रिपाठी या आयोगाचे अध्यक्ष असतील, तर माजी डीजीपी सुभेश कुमार सिंह आणि माजी जिल्हा न्यायाधीश ब्रिजेश कुमार सोनी या आयोगाचे सदस्य असतील.
अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येचा आरोप असलेल्या तीन शूटर्संना पोलीस कोठडीत ठेवण्याची तयारी पोलीस करत आहेत. आज दुपारी 4 वाजता पोलीस तिन्ही शूटर्संना रिमांड मॅजिस्ट्रेटसमोर हजर करणार आहेत. रविवारी न्यायालयाने तिन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.