Minister of State for Home Harsh Sanghvi

 

Dainik Gomantak 

देश

गुजरातमध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

कच्छ जिल्ह्यातील अंजार तालुक्यातील दुधई गावात रॅलीदरम्यान 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

गुजरातमधील (Gujarat) एकूण 8686 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. त्याचवेळी कच्छ जिल्ह्यातील अंजार तालुक्यातील दुधई गावात रॅलीदरम्यान 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

घोषणाबाजीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी (Minister of State for Home Harsh Sanghvi) यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान संघवी म्हणाले की, याप्रकरणी कच्छच्या रेंज आयजींशी चर्चा झाली आहे. चौकशीअंती आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणालाही सोडले जाणार नाही.

महिला सरपंचाच्या विजयानिमित्त जोरदार घोषणाबाजी

दुधई गावात मंगळवारी सायंकाळी 4200 मतांनी निवडणूक निकाल जाहीर झाला. ज्यामध्ये रीनाबेन रंगुभाई कोठीवार यांना 1026 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मतदान केंद्र सोडले. दरम्यान, जमावातील काही लोकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. मात्र, घोषणाबाजी करणाऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

घोषणा ओळखल्या नाहीत

विजयी महिला सरपंच रीनाबेन रंगुभाई कोठीवार यांचे पती रघुभाई कोठीवार यांनी पोलिस चौकशीत सांगितले की, आम्हालाही व्हिडिओची माहिती मिळाली आहे. विजयानंतर आमचे समर्थक जल्लोषात घोषणाबाजी करत होते, मात्र देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांची माहिती नाही. आम्ही आमच्या स्तरावरही याबाबत माहिती गोळा करत आहोत.

याबाबत दुधईचे पीएसआय गोहिल यांनी सांगितले की, असा व्हिडिओ आमच्यापर्यंत आला असून, व्हिडिओमध्ये घोषणाबाजीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. तरुणाची ओळख पटवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: "माझे घर" योजना सप्टेंबरपासून लागू - मुख्यमंत्री

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT