Zubeen Garg Death Dainik Gomantak
देश

Zubeen Garg Death: मनोरंजन विश्वात खळबळ, प्रसिध्द गायकाचं उपचारादरम्यान मूत्यू; स्कूबा डायव्हिंग करताना झाला होता अपघात

Assams Music Icon Zubeen Garg Dies: आसामचे प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग (वय 52) यांचे सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगच्या एका दुर्दैवी अपघातात निधन झाले.

Manish Jadhav

Zubeen Garg Death: आसामचे प्रसिद्ध गायक आणि बॉलिवूडमध्ये आपल्या आवाजाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे जुबीन गर्ग (वय 52) यांचे सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगच्या एका दुर्दैवी अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली मृत्यूने संगीत क्षेत्राला आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना समुद्रातून बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही.

जुबीन गर्ग हे सिंगापूरमध्ये आयोजित 'सिंगापूर नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हल'मध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपली कला सादर करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान ही हृदयद्रावक घटना घडली. जुबीन गर्ग यांच्या निधनाची बातमी कळताच केवळ आसाममध्येच नव्हे, तर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

जुबीन गर्ग यांचे संगीत जीवन

जुबीन गर्ग यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1972 रोजी आसाममधील जोरहाट येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांनी आपले जीवन संगीतालाच समर्पित केले. आसामी आणि बंगाली संगीत जगतात त्यांना एक सुपरस्टार गायक आणि संगीतकार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या अफाट प्रतिभेमुळे त्यांनी 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आणि लाखो लोकांची मने जिंकली. आसामी सिनेमा आणि संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना प्रेमाने 'आसामचा रॉकस्टार' असे म्हटले जाते.

'या अली' गाण्याने मिळवून दिली ओळख

क्षेत्रीय संगीतासोबतच जुबीन गर्ग यांनी बॉलिवूडमध्येही आपले एक खास स्थान निर्माण केले. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गँगस्टर' चित्रपटातील (Movie) त्यांचे 'या अली' हे गाणे त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरले. या एकाच गाण्याने त्यांना देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या गाण्यातील त्यांचा आवाज आणि भावपूर्ण गायकी यामुळे ते तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले. 'या अली' व्यतिरिक्त त्यांनी 'क्रिश 3' मधील 'दिल तू ही बता', 'प्यार के साइड इफेक्ट्स' मधील 'जाने क्या चाहे मन बावरा' आणि अशा अनेक हिट गाण्यांना आपला आवाज दिला. जुबीन यांच्या आवाजात एक वेगळीच जादू आणि भावनात्मकता होती, जी श्रोत्यांना नेहमीच मंत्रमुग्ध करत असे.

समाजकार्यातही होते सक्रिय

जुबीन गर्ग केवळ एक महान गायकच नव्हते, तर ते समाजकार्यातही सक्रिय होते. आसामची समृद्ध सांस्कृतिक ओळख आणि वारसा जपण्यासाठी आणि त्याला पुढे नेण्यासाठी त्यांनी खूप काम केले. तरुण पिढीला आपल्या मूळ संस्कृती आणि संगीताशी जोडण्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. त्यांच्या या कार्यामुळे ते केवळ एक कलाकार म्हणून नाही, तर एक संवेदनशील व्यक्ती म्हणूनही ओळखले जात होते.

मात्र त्यांच्या अचानक जाण्याने आसामच्या (Assam) सांस्कृतिक क्षेत्राला आणि संपूर्ण संगीत जगताला मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी, राजकारण्यांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचे संगीत, त्यांचा आवाज आणि त्यांची कला कायमच आपल्या स्मरणात राहील. जुबीन गर्ग यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून दिलेला वारसा येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात मणिपूरच्या 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, भाड्याच्या खोलीत आढळला बेशुद्धावस्थेत; पोलिसांकडून तपास सुरु

चांदीच्या जोडव्यांसाठी 65 वर्षीय महिलेचे कापले पाय, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या; राजस्थानातील थरकाप उडवणारी घटना VIDEO

Horoscope: नशीब चमकणार! 'कर्क-मिथुन'सह 4 राशींना मिळणार दुप्पट लाभ, पाहा तुमची रास आहे का?

India Afghanistan Relations: भारतीयांसाठी अफगाणिस्तानचे दार खुले, तालिबानी नेत्यानं दिली ऑफर; पाकिस्तानातील दहशतवादावरही स्पष्ट केली भूमिका VIDEO

सूर्यकुमार यादवला धक्का! मुंबई संघातून पत्ता कट, नेतृत्वाची कमान 'या' खेळाडूच्या हाती

SCROLL FOR NEXT