Aminul Islam
Aminul Islam Dainik Gomantak
देश

Assam: '...RSS अन् बजरंग दल हजारपट धोकादायक', आसामच्या MLA चे वादग्रस्त वक्तव्य

दैनिक गोमन्तक

AIUDF MLA Aminul Islam: आसाममधील एआययूडीएफचे आमदार अमिनुल इस्लाम यांनी आरएसएस आणि बजरंग दलावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. शनिवारी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना अमीनुल म्हणाले की, 'सरकारकडे पीएफआयवर बंदी घालण्याचे पुरावे असतील तर ते ठीक आहे. पण आरएसएस आणि बजरंग दल या पेक्षा हजार पटींनी धोकादायक संघटना आहेत, त्यांच्यावरही बंदी घातली पाहिजे. असे केल्यानेच भारतात बंधुभाव आणि शांतता प्रस्थापित होईल.'

एआययूडीएफ पक्षाचे आमदार अमिनुल म्हणाले की, "आरएसएस (RSS) आणि बजरंग दल हे पीएफआयपेक्षा हजारपट जास्त धोकादायक आहेत. अशा इतरही अतिरेकी संघटना आहेत, ज्या मॉब लिंचिंग करतात. धर्माच्या नावाखाली कोणाची तरी हत्या करतात. ते इतर धर्मातील लोकांना मारतात आणि त्यांच्याशी संबंधित वस्तूंची तोडफोड करतात.''

'...त्यांचे सदस्य तर आयएसआयचे एजंट निघाले'

अमीनुल इस्लाम इथेच थांबले नाही तर बजरंग दल आणि आरएसएसचे अनेक सदस्य पाकिस्तानच्या (Pakistan) आयएसआयचे एजंट निघाले असल्याचा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, 'ज्या मॉब लिंचिंगच्या घटना यूपी, बिहार, राजस्थान किंवा मध्य प्रदेशात घडल्या आहेत, त्यात धर्माच्या नावाखाली इतर धर्माच्या लोकांना मारणारे त्यात सहभागी आहेत.'

तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न : अमीनुल

अमीनुल इस्लाम पुढे म्हणाले की, 'कधी कधी असे घडते की, हे लोक मशिदींवर हल्ला करतात. ते इतर धर्माच्या लोकांनाही चिडवतात. हे लोक अशी विधाने करतात, ज्यामुळे परस्पर बंधुभावात तेढ निर्माण होते. या लोकांना जर कोणी मुस्लिम व्यक्ती एकटा दिसला तर ते जय श्री राम म्हणत त्याला मारतात. अशा घटना घडल्या आहेत. जोपर्यंत या लोकांना भाजप सरकारचा पाठिंबा मिळत राहील, तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही. त्यामुळे खून करुनही हे लोक आरामात जीवन जगत आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmal Garbage : हरमल वेशीवर कचराच; विद्रूपीकरण थांबवा

Ponda News : फोंड्याच्या मताधिक्यावर भाजप नेत्यांचे लक्ष; विधानसभेसाठी अनेक दावेदार

पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्राच्या आधारावर FIR रद्द होणार नाही, पती-पत्नीमधील वादात HC चा निर्णय

Morjim Beach : किनारपट्टीवर नशेचे सावट गडद ; युवापिढी संकटात

India Economy: भारत दशकातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, चीनला मागे टाकणार; UN नंतर IMF नं वर्तवलं भाकित

SCROLL FOR NEXT