Aero India Show 2023 Dainik Gomantak
देश

Aero India Show 2023: आशियातील सर्वात मोठा एरो शो आजपासून बेंगळुरूमध्ये; पीएम मोदी करणार उद्घाटन

5 दिवस कार्यक्रम : 32 देशांचे संरक्षण मंत्री उपस्थित राहणार, 73 सीईओंची उपस्थिती

Akshay Nirmale

Aero India Show 2023: आशियातील सर्वात मोठा एरो शो कर्नाटकात सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्डचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातो.

या पाच दिवसीय कार्यक्रमात भारताची संरक्षण क्षमता ठळकपणे दाखवण्यात येणार आहे. एकूण 29 देशांचे हवाई प्रमुख, 73 सीईओही दार ठोठावणार आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या कार्यक्रमाबाबत म्हणाले की, एरो इंडियाचा हा कार्यक्रम भारताची संरक्षण क्षमता ठळकपणे दाखवून देणार आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात याचे योगदान महत्वाचे राहिल.

विमान वाहतूक क्षेत्राचाही विकास या कार्यक्रमातून होणार आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा एरो शो आहे. 16 ते 17 फेब्रुवारी रोजी सर्वसामान्यांनाही येथे येऊन कार्यक्रम पाहता येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन येलहंका एअरफोर्स स्टेशनवर केले जाईल. या कार्यक्रमात एकूण 98 देश सहभागी होणार असून, 32 देशांचे संरक्षण मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय 809 संरक्षण कंपन्याही या कार्यक्रमात येणार आहेत, मोठी गोष्ट म्हणजे अनेक स्टार्टअप कंपन्या लोकांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून देणार आहेत.

विशेष म्हणजे यावेळी कार्यक्रमात UAV क्षेत्राच्या वाढीवर, भविष्यातील अद्भुत तंत्रज्ञानावर विशेष भर दिला जाणार आहे. एलसीए तेजस, डॉर्नियर लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर आणि अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर याच्या निर्यातीलाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.

दरम्यान, या कार्यक्रम काळात ट्रॅफिक जॅमची समस्या उद्भवून नये, म्हणून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. लोकांना शिस्त पाळण्याचे आणि गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT