Asia Cup 2025 Dainik Gomantak
देश

Asia Cup 2025: आशिया चषकातील सुपर-4 फेरीचे सामने निश्चित, भारत 'या' संघांविरुद्ध भिडणार; संपूर्ण वेळापत्रक पाहा

Asia Cup 2025 Super-4: भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ २०२५ च्या आशिया कपच्या सुपर फोरमध्ये पात्र ठरले आहेत.

Sameer Amunekar

Asia Cup 2025 match schedule

आशिया कप २०२५ क्रिकेट स्पर्धेत रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने अफगाणिस्तानचा ६ विकेट्सनी पराभव करत सुपर ४ फेरीत एन्ट्री घेतली. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावांचे आव्हान दिले होते, परंतु श्रीलंकेच्या फलंदाजांनी दमदार खेळ करत हे लक्ष्य सहज गाठले. श्रीलंकेने गट फेरीतील सर्व तीन सामने जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

कुसल मेंडिसची धडाकेबाज खेळी

श्रीलंकेच्या विजयात कुसल मेंडिस हा मुख्य शिलेदार ठरला. त्याने ५२ चेंडूत १० चौकारांसह ७४ धावा करत संघाला भक्कम पाया दिला. त्याला कुसल परेराने (२८ धावा) चांगली साथ दिली. शेवटी, कामिंदू मेंडिसने फक्त १३ चेंडूत २६ धावांची खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

सुपर ४ चे चार संघ निश्चित

गट अ मधून भारत आणि पाकिस्तानने तर गट ब मधून श्रीलंका आणि बांगलादेशने सुपर ४ मध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे या चारही दिग्गज संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीसाठी चुरशीची लढत रंगणार आहे. सुपर ४ पॉइंट टेबलमध्ये अव्वल दोन स्थान मिळवणारे संघ अंतिम फेरीत दाखल होतील.

भारत-पाकिस्तान सामना कधी?

भारतीय क्रिकेट संघ सुपर ४ मधील आपला पहिला सामना २१ सप्टेंबर रोजी प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळेल. त्यानंतर २४ सप्टेंबरला भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध आणि २६ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यांकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागलेल्या आहेत.

सुपर ४ चे संपूर्ण वेळापत्रक

  • बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – २० सप्टेंबर

  • भारत विरुद्ध पाकिस्तान – २१ सप्टेंबर

  • पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका – २३ सप्टेंबर

  • बांगलादेश विरुद्ध भारत – २४ सप्टेंबर

  • बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान – २५ सप्टेंबर

  • भारत विरुद्ध श्रीलंका – २६ सप्टेंबर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amol Muzumdar: ‘..हा पुढचा सचिन तेंडुलकर'! पदार्पणात 260 धावांची खेळी, हिटमॅन रोहितला दिली संधी; विश्वचषकामागचा 'नायक'

Goa Politics: 'स्थलांतरित-समर्थक' सरकार दीड वर्षात पडणार, RGP स्थापन करणार पुढचे सरकार! मनोज परब यांचा मोठा दावा

SIR Campaign In Goa: गोव्यात 'एसआयआर' मोहिमेला सुरुवात, बूथ लेव्हल अधिकारी करणार डोर-टू-डोर सर्व्हे; डॉक्युमेंट तयार ठेवण्याचे मतदारांना आवाहन

गोव्यातील 'त्या' भीषण अपघातात अखिल भारतीय सॅपेक टॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ खेळाडुचा मृत्यू

Pakistan Supreme Court Blast: पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा धमाका! 12 जण गंभीर जखमी; स्फोटाचे नेमके कारण काय?

SCROLL FOR NEXT