Asia Cup 2025 Dainik Gomantak
देश

Asia Cup 2025: BCCI चा मोठा निर्णय! जैसवाल, वॉशिंग्टनसह 5 जणांना झटका; दुबईला न नेण्याचा घेतला निर्णय

Asia Cup 2025 India squad: संघ ४ सप्टेंबर रोजी दुबईत जमणार असून ५ सप्टेंबरपासून आयसीसी अकादमीत सराव सत्रे सुरू होतील. खेळाडूंना थेट त्यांच्या शहरांतून दुबईला जाण्याची परवानगी दिली आहे.

Sameer Panditrao

दुबई: आगामी आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या पाच स्टँडबाय खेळाडूंना – यशस्वी जैसवाल, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि ध्रुव जुरेल – दुबईला मुख्य संघासोबत नेले जाणार नाही, असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी सांगितले, “स्टँडबाय खेळाडू दुबईला जाणार नाहीत. त्यांना फक्त गरज भासल्यास बोलावले जाईल.” यामुळे संघ व्यवस्थापनाची धोरणे स्पष्ट झाली आहेत की, प्रवासासाठी लहान गटावर भर दिला जाणार आहे.

जरी नियमानुसार १७ खेळाडूंचा समावेश करता आला तरी भारताने आशिया कपसाठी फक्त १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. संघाकडे आधीच शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन असे सलामीवीर आहेत.

त्यामुळे यशस्वी जैसवाल केवळ दुखापत झाल्यास संघात येऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रसिद्ध कृष्णा फक्त जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह किंवा हर्षित राणा यांना दुखापत झाल्यासच विचारात घेतला जाईल.

संघ ४ सप्टेंबर रोजी दुबईत जमणार असून ५ सप्टेंबरपासून आयसीसी अकादमीत सराव सत्रे सुरू होतील. खेळाडूंना थेट त्यांच्या शहरांतून दुबईला जाण्याची परवानगी दिली आहे. “सर्व खेळाडू ४ सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत दुबईत पोहोचतील.

काही जण मुंबईहून जातील, पण बाकींचे थेट उड्डाण सोयीस्कर असल्याने त्यांना तसेच पाठवले जात आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारत आपला मोहिमेचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध खेळेल. त्यानंतर १४ सप्टेंबरला पाकिस्तान आणि १९ सप्टेंबरला ओमान यांच्याविरुद्ध गटसाखळी सामने होतील. त्यानंतर सुपर फोर फेरी सुरू होईल.

दरम्यान, अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा सध्या दिलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत नॉर्थ झोनकडून खेळत आहेत, तर कुलदीप यादव सेंट्रल झोनकडून मैदानात उतरला आहे.

भारताचा आशिया कप २०२५ संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Nirmalya Kalash: म्हापसा येथे 'निर्मल्या कलश' ठरला गेम चेंजर; गणेशोत्सवात घालून दिला पर्यावरण रक्षणाचा नवा आदर्श!

Acidity: पोटातली जळजळ धोकादायक! अ‍ॅसिडिटीमुळे होऊ शकतात 'हे' 5 गंभीर आजार, वेळीच व्हा सावध; जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

PM Modi In China: पंतप्रधान मोदींची ग्लोबल फॅन फॉलोईंग! चीनी सोशल मीडियावर ‘नंबर-1’ वर ट्रेंड; जिनपिंग-पुतिनसोबतची भेट ठरली खास

पार्टीत ओळख, मैत्री, प्रेम आणि लग्न... प्रियाच्या जाण्याने प्रेमकथा अपूर्ण; 'ती' पोस्ट होतेय Viral

Bashudev Bhandari case: बाशुदेव भंडारी प्रकरण; एक वर्षानंतरही ‘तो’ कुठे आहे? गूढ कायम

SCROLL FOR NEXT