PAK Fan Controversy Dainik Gomantak
देश

PAK Fan Controversy Statement: पाकिस्तानचा 'सनकी' चाहता! हारिस रौफला भेटला अन् म्हणाला, "बदला लेना, इंडिया को छोड़ना नहीं..." Watch Video

Pak Fan's 'India Ko Chhodna Nahi' Plea To Haris Rauf: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या रोमांचक सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर मात करून आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Sameer Amunekar

Pak Fan's 'India Ko Chhodna Nahi' Plea To Haris Rauf Video Viral

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या रोमांचक सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर मात करून आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या विजयामुळे पाकिस्तानने भारताविरुद्ध होणाऱ्या निर्णायक सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, या सामन्यानंतर घडलेल्या एका छोट्याशा घटनेने सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हारिस रौफ सामन्यानंतर चाहत्यांना भेटायला गेला असता, एका चाहत्याने त्याचा हात धरून भावनिक विनंती केली, "आपल्याला बदला घ्यायचा आहे, भारताला आता सोडायचं नाही, खुदा का वास्ता!" ही विनंती ऐकताच तिथे उपस्थित प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली. काही वेळातच या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेटिझन्सनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली.

भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने नेहमीच चर्चेचा आणि भावनांचा केंद्रबिंदू राहिले आहेत. हे सामने फक्त खेळापुरते मर्यादित न राहता अनेकदा राजकीय आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीने रंगलेले दिसतात. यावेळी आशिया कपमध्येही तणावाची पातळी अधिकच वाढली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच वाद निर्माण झाले. पहलगाममधील दुःखद घटनेनंतर, गट टप्प्यातील सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता.

भारताने पाकिस्तानविरुद्ध सहज विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतरही हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याने पाकिस्तान संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नाही तर त्यांनी स्पर्धेतून माघार घेण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर सुपर फोर फेरीतही तणावाचे वातावरण कायम राहिले.

सलमान अली आगा यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला, पण अखेर ते भारतापुढे पराभूत झाले. शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांच्या आक्रमक हालचालींमुळे सामन्यादरम्यान मैदानावरील वातावरण अधिकच तापले.

आता अंतिम फेरी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार असल्याने हा सामना ऐतिहासिक ठरणार यात शंका नाही. चाहत्यांपासून ते माजी खेळाडूंपर्यंत सर्वांचे लक्ष दुबईतील या निर्णायक लढतीकडे लागले आहे. सोशल मीडियावरील हारिस रौफच्या व्हिडिओने आधीच चाहत्यांमध्ये तुफान उत्सुकता निर्माण केली असून, दोन्ही संघांमधील सामना ‘हाय व्होल्टेज क्लॅश’ ठरणार हे निश्चित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

SCROLL FOR NEXT