Prime Minister Narendra Modi Twitter/ @ANI
देश

ASEAN-India Summit: 'आमची भागीदारी 2022 मध्ये 30 वर्षे पूर्ण करेल'

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 18 व्या आसियान-भारत शिखर परिषदेला (ASEAN-India Summit) संबोधित केले.

दैनिक गोमन्तक

भारताचे (India) शेजारील देशांशी मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण संबंध राहीले आहेत. त्याचबरोबर प्रादेशिक संघटनांमध्येही सातत्याने भारत अग्रगण्य भूमिका घेत आला आहे. नेपाळ (Nepal), भूतान, बांग्लादेश (Bangladesh), म्यानमार यासारख्या शेजारील देशांबरोबर भारताचे राजकीय, सांस्कृतिक, आणि आर्थिक संबंध नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सत्तेत आल्यानंतर वेगाने बदलत गेले. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 18 व्या आसियान-भारत शिखर परिषदेला (ASEAN-India Summit) संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, ''कोरोना महामारीमुळे आम्हा सर्वांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. परंतु हा आव्हानात्मक काळ भारत-आसियान मैत्रीचा कसोटी काळ ठरला आहे. कोरोना काळातील आमचे परस्पर सहकार्य, परस्पर सहानुभूती भविष्यात आमचे नाते दृढ करत राहील.''

दरम्यान, 18 वी आसियान-भारत शिखर परिषद कोरोना महामारी (Covid 19), आंतरराष्ट्रीय विकास, व्यापार आणि इतर मुद्द्यांवर केंद्रित आहे. पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, इतिहास साक्षी आहे की भारत आणि आसियान यांच्यात हजारो वर्षांपासूनचे सांस्कृतिक संबंध राहिले आहेत. त्यांची सामायिक मूल्ये, परंपरा, भाषा, ग्रंथ, वास्तुकला, संस्कृती ही आपली सामायिक मूल्ये प्रतिबिंबित करतात आणि म्हणूनच आसियानची एकता आणि केंद्रस्थान भारतासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे.

ASEAN-भारत भागीदारी 2022 मध्ये 30 वर्षे पूर्ण करेल

नरेंद्र मोदी म्हणाले की, '2022 मध्ये आसियान-भारत भागीदारीला 30 वर्षे पूर्ण होतील. त्याचबरोबर भारतालाही आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होतील. हा महत्त्वाचा टप्पा 'आसियान-भारत मैत्री वर्ष' म्हणून साजरा केला जाईल आणि याचा मला खूप आनंद आहे.'

भारत पूर्व आशिया शिखर परिषदेला बळकट करण्यासाठी वचनबद्ध

भारत, पूर्व आशिया शिखर परिषदेचा संस्थापक सदस्य असल्याने, पूर्व आशिया शिखर परिषदेला बळकट करण्यासाठी आणि समकालीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिक प्रभावी बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. या अंतर्गत पंतप्रधान मोदींनी 18व्या आसियान-भारत शिखर परिषदेत आसियानची स्थिती आणि भारताच्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला. पूर्व आशिया शिखर परिषद हे इंडो-पॅसिफिकमधील प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखालील एक मंच आहे. 2005 मध्ये स्थापन झाल्यापासून, फोरमने पूर्व आशियाच्या धोरणात्मक आणि भू-राजकीय विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 10 ASEAN सदस्य देशांव्यतिरिक्त, पूर्व आशिया शिखर परिषदेत भारत, चीन, जपान, कोरिया प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका आणि रशिया यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT