Asaduddin Owaisi Criticize Modi Government Dainik Gomantak
देश

"मोडी सरकारनं गरीबांविरुद्ध युद्ध पुकारलं": असदुद्दीन ओवेसींचा घणाघात

दिल्लीतील (Delhi) शोभा यात्रेदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर आता एमसीडी जहांगीरपुरी भागातील अवैध अतिक्रमण हटवण्याची कारवाई करणार आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्लीतील शोभा यात्रेदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर (Jahangirpuri Violence) आता एमसीडी जहांगीरपुरी भागातील अवैध अतिक्रमण हटवण्याची कारवाई करणार आहे. या भागातील अवैध धंदे हटवण्यासाठी इथे 400 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कारवाईचा संदर्भ देत AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला केला. प्रशासनाच्या या कारवाईबाबत त्यांनी सोशल मीडियावर ट्विटही केले आहे. (Asaduddin Owaisi has criticized the Narendra Modi government)

दरम्यान, भाजपने गरिबांच्या विरोधात युद्ध पुकारले आहे, असे ओवेसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अवैध अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली हे लोक यूपी, एमपी प्रमाणे दिल्लीतही (Delhi) लोकांची घरे पाडत आहेत. या लोकांना नोटीसही मिळाली नाही, कोर्टात जाण्याची संधीही दिली नाही. गरीब मुस्लिमांना शिक्षा होत आहे, कारण त्यांनी जगण्याचे धाडस दाखवले आहे. या संपूर्ण प्रकरणावर अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.

तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या सरकारचा पीडब्ल्यूडी विभागही या मोहिमेचा एक भाग आहे का, असा सवालही ओवेसी यांनी केला. जहांगीरपुरीच्या जनतेने त्यांना मतदान केले नाही का, ही कृती त्या लोकांचा विश्वासघात नाही का, भ्याडपणा नाही का? पोलिस आमच्या पाठीशी नाहीत, ही सबब आता चालणार नाही. आता सरकार नैतिकता आणि कायदेशीरपणाचा आव आणत आहे, असेही ओवेसी यांनी म्हटले.

याशिवाय, हनुमान जयंतीनिमित्त दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात अचानक हिंसाचार झाला, ज्याच अनेक लोक जखमी झाले. यादरम्यान एका पोलिसालाही गोळी लागली. या प्रकरणी आतापर्यंत 20 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे, तर एनएसए अंतर्गत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT