Jammu and Kashmir Dainik Gomantak
देश

काश्मीरच्या तुरुंगात दहशतवादी नेटवर्क? ISI कडून टार्गेट किलिंगचा अजेंडा तयार

पाकचे हे नापाक कारस्थान उघड झाल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या तुरुंगात बंद असलेल्या दहशतवाद्यांना भारताच्या अन्य तुरुंगात पाठवले जाऊ शकते.

दैनिक गोमन्तक

काश्मीरच्या तुरुंगातून चालणारे दहशतवादी नेटवर्क आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय तुरुंगात बंद केलेल्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून टारगेट किलिंग घडवून आणण्यात गुंतलेली आहे. आयएसआय आपल्या दहशतवाद्यांना स्पष्टपणे सांगत आहे की जर ते मोठ्यांना लक्ष्य करू शकत नसतील तर अशा लोकांना लक्ष्य करा ज्यांच्याकडून प्रचार आणि दहशत पसरवली जाईल. पाकचे हे नापाक कारस्थान उघड झाल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या तुरुंगात बंद असलेल्या अनेक दहशतवाद्यांना भारताच्या अन्य तुरुंगात पाठवले जाऊ शकते. (Jammu Kashmir Target killings)

काश्मीरमध्ये दिवसेंदिवस टार्गेट किलिंगच्या घटना घडत होत्या, काश्मीरमध्ये शांतता आवडणारे लोक टार्गेट किलिंगचा शिकार झाले. 22 दिवसांत दहशतवाद्यांनी एकामागे एक टार्गेट किलिंग केले, ज्यामुळे संपूर्ण काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हे प्रकरण पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांच्या पलायनापर्यंत येऊन पोहचले. अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक बोलावली, ज्यामध्ये जम्मू-काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरपासून वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

काश्मीरच्या तुरुंगातून दहशतवादी नेटवर्क?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी काश्मीरमधील परिस्थितीबाबत कठोर भूमिका घेतली आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. दहशतवाद्यांवर गोळ्या घालण्या बरोबरच त्यांच्या मुळावर घाव घालून दहशतवादाचा नायनाट करण्याच्या सुचना या बैठकित देण्यात आल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता, पाकिस्तानचे आणखी एक नापाक कारस्थान समोर आले आहे. त्याचा कोणी स्थानिक शिष्य लोकांना भेटायला आला की, त्याला नंबर देऊन त्याला संपर्क करण्यास सांगितले जाते. हा संपर्क पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या लोकांशी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गुप्तचर यंत्रणा तुरुंगांवर लक्ष ठेवतात

गुप्तचर यंत्रणांनी यापूर्वी काश्मीरमधील कोट भलवाल कारागृहासह काही तुरुंगांवर छापे टाकले होते. त्यादरम्यान काही दहशतवाद्यांकडून मोबाईल फोन आणि सिमही जप्त करण्यात आले. या वस्तूंच्या तपासादरम्यान पाकिस्तानचे नापाक कारस्थान उघडकीस आणले असून आता या कटात गुंतलेल्या दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात येत आहे. त्या आधारे अनेक दहशतवाद्यांना या तुरुंगांमधून काढून भारताच्या अन्य तुरुंगात पाठवले जाणार आहे.

सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये 14 तुरुंग आहेत, यामध्ये 2 मध्यवर्ती कारागृह, 8 जिल्हा कारागृह, 3 सब-जेल आणि एक विशेष कारागृहचा समावेश आहे. हे तुरुंग जम्मू, कठुआ, बारामुल्ला, श्रीनगर, उधमपूर, राजौरी इत्यादी ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये अनेक काश्मिरी आणि पाकिस्तानी दहशतवादी बंद आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT