Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

तुम्ही मास्क घातला तर सरकार लॉकडाऊन लावणार नाही: केजरीवाल

डॉक्टरांच्या मते, गंभीर रुग्णांचे वय 40 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर भाष्य केले आणि दिल्लीत लॉकडाऊन होणार का?, या प्रश्नाचे उत्तर दिले. (Arvind Kejriwal says Lockdown will not be imposed in Delhi if people adhere to the rules)

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, जर तुम्ही मास्क घातला तर सरकार लॉकडाऊन लावणार नाही. दिल्लीत लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. लोकांना दवाखान्यात जाण्याची फारशी गरज नाही. केवळ गंभीर आजारी रुग्णांनीच रुग्णालयात जावे. कोरोनाच्या परिस्थितीवर सोमवारी बैठक होणार आहे.

राजधानीत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत (Delhi) शनिवारी 97,762 नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 17.73 टक्के लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. यादरम्यान 8,951 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.
कोविड वॉर्डमध्ये 996 रुग्ण दाखल असून 286 रुग्ण ऑक्सिजन थेरपीवर आहेत.

31 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टरांच्या मते, गंभीर रुग्णांचे वय 40 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. आकडेवारीनुसार, दिल्लीत कोरोना संसर्गाच्या एकूण रुग्णांनी 15 लाखांचा आकडा पार केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT