Arvind Kejriwal
Arvind Kejriwal  Dainik Gomantak
देश

'केंद्र सरकारला शेतकऱ्यांना स्टेडियममध्ये कैद करायचे होते, पण...': अरविंद केजरीवाल

दैनिक गोमन्तक

आप शासित पंजाबमधील एका आयोजित कार्यक्रमादरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आठवण करुन दिली. यावेळी ते म्हणाले की, कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा बिमोड करण्यासाठी केंद्र सरकारला दिल्लीतील स्टेडियमचे तात्पुरत्या तुरुंगात रुपांतर करायचे होते. (Arvind Kejriwal said The central government wanted to imprison the farmers in the stadium)

सीएम केजरीवाल (Arvind Kejriwal) पुढे म्हणाले, "मी अण्णा आंदोलनातून पुढे आलो आहे. त्यावेळी आमच्यासोबतही असेच केले गेले. ते आम्हाला स्टेडियममध्ये ठेवायचे. मीही बरेच दिवस स्टेडियममध्ये राहिलो. मला समजले की, शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा हा डाव आहे.''

'आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत'

ते पुढे म्हणाले, "दिल्लीत (Delhi) दाखल झालेल्या शेतकऱ्यांना स्टेडियममध्ये रोखून ठेवले असते, तर शेतकऱ्यांचे आंदोलन एका स्टेडियमपुरते मर्यादित राहिले असते. परंतु आम्ही तसे करण्यास नकार दिला. आम्ही स्टेडियमचे तुरुंगात रुपांतर करणार नसल्याचे सांगितले. ते (केंद्र) त्यामुळे रागावले, परंतु आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहीलो.''

केजरीवाल म्हणाले, "दिल्ली सरकारने आंदोलक शेतकर्‍यांना मदत केली. त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालयाची सुविधा, लंगरमध्ये जेवण दिले. आम्ही शेतकरी बांधवांना मदत केली याचा आम्हाला आनंद आहे. आमच्याकडून जे शक्य होते ते आम्ही केले."

राकेश टिकैत देखील कार्यक्रमाला उपस्थित होते

ज्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी या गोष्टी सांगितल्या त्या कार्यक्रमात शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) देखील उपस्थित होते. राकेश हे वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात आंदोलन करणाऱ्या नेत्यांपैकी एक होते, जे शेवटी रद्द करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT